गोंदिया जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असून या प्रकरणाचा सखोल तपासाकरिता एसआयटी नेमल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. तपासात कोणतीही हयगय न करता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गोंदिया जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते. आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अल्पकालीन चर्चा घडवून आणली. राज्यातील महिला अत्याचार प्रकरणाचे दाखले दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे सांगत संपूर्ण घटनाक्रम वाचून दाखवला. तपासकार्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाराच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच दुसरी मावळमध्ये घडलेल्या घटनेची देखील चौकशी केली असून मुलाला अटक केली आहे. संबंधित मुलाला अश्लील व्हिडिओ बघण्याचे व्यसन होते. त्यातून त्याने हे कृत्ये केल्याची बाब फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
‘ती’ महिला मानसिक रुग्ण
भंडारा जिल्ह्यातील ज्या महिलेवर अत्याचार झाले. मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्यावर जी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ती महिन्याने करावी लागणार आहे. तसे नियोजन केले असून महिन्याभरात तिची शस्त्रक्रिया पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार
या घटनेतील दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. त्याच्या शोधासाठी टीम तैनात केल्या आहेत. शोध सुरू आहे; परंतु ज्या पध्दतीने आरोपीचे वर्णन संबंधित महिला करत आहे, त्यानुसार आरोपी सापडत नाही. दोघांचा तपास केला त्यात एक २१ वर्ष तर एक पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे मुख्य आरोपींचा शोध घेण्यास अडथळे येत असल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र कोणाचीही हयगय केले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू असा इशाराही दिला.