पाण्याच्या टँकर खाली सापडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, नागरिकांकडून तीव्र संताप
पुणे, वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली सापडून एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाणी टाकून परत जात असताना चालकाने टँकर रिव्हर्स घेतला. नागरिक हातकरून चालकाला सांगत होते, पण त्याने लक्ष दिले नाही आणि टँकर वेगात रिव्हर्स घेतला. त्यावेळी पाठिमागे असलेल्या मुलगा चाकाखाली आला. दरम्यान, याघटनेनंतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
१४ वर्षीय मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू; माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार
अदोक्षक महेश वहाळे (वय १८ महिने, रा. गणपती माथा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी टँकर चालक सनी प्यारे बारसकर (वय ३३, रा. दत्तवाडी, मुळ. भोपाळ) याला अटक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वहाळे कुटूंबिय गणपती माथा येथील एका सोसायटीत सायंकाळी साडे सातच्या सुमारास पाणी टाकण्यासाठी पाण्याचा टँकर आला होता. त्याने सोसायटीत पाहणी टाकले. पाणी टाकून झाल्यानंतर तो पुन्हा परत निघाला होता.
Thane : शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
परंतु, सोसायटीकडे जाताना अरूंद गल्लीत रस्ते आहेत. त्यामुळे टँकर किंवा इतर मोठ्या वाहनांना कसरत करावी लागते. तेव्हा टँकर चालक बारसकर याने रिव्हर्स घेण्यास सुरूवात केली. मात्र, तेव्हा दोन वर्षाचा अदोक्षक पाठिमागे खेळत होता. नागरिकांनी चालकाला टँकर मागे घेताना हातवारेकरून सांगत होते. पण, त्याचे लक्ष नव्हते. त्याने भरधाव टँकर रिर्व्स घेतला. तेव्हा पाठिमागच्या चाकाखाली अदोक्षक आला आणि तो चिरडला गेला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.