Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा

शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 13, 2025 | 12:58 PM
“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग- भारत रांजणकर /विजय काते : शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांचे बॅरिकेड तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. जवळपास तास दीड तास पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू राहिली.हा मोर्चा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रसाद भोईर, दिपश्री पोटफोडे, शिरीष घरत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे व चिखल साचल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.

मोर्चात सहभागी शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत स्थानिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर पोलिसांनी बॅरिकेड उभारून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांचा कडोबा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट

जनआक्रोश मोर्चातील मागण्या काय ?

  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालकीच्या डान्स बारमधील बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे.
  • MIDC, MMRDA व सार्वजनिक बांधकाम खात्यातील मागील सोळा वर्षांतील अनियमिततेबाबत CAGमार्फत विशेष ऑडिट करून चौकशी करावी.
  • कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील पवित्रतेचा भंग आणि त्यांच्या जागी क्रीडामंत्री बनवण्याचा प्रयत्न रोखावा.
  • नाशिक येथील ‘हनिन ट्रॅप’ प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी.
  • ‘वोट चोरी’ प्रकरणातील आरोपींवर निवडणूक आयोगाने तत्काळ चौकशी करून कारवाई करावी.
  • गृहनिर्माण मंत्री प्रा. संजय सर्णाईक यांच्या ‘पीडीडी’ प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
  • राज्यातील लाडक्या बहिणींना मंजूर अनुदानातील गैरव्यवहारात सामील अधिकाऱ्यांवर प्रथम गुन्हे दाखल करूनच पुढील निर्णय घ्यावा.

देशातील ट्रॅक्टरला लागणार जीपीएस, ब्लॅक बॉक्स; आमदार सतेज पाटलांचा तीव्र विरोध

याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये देखील ठाकरे गटाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या बेजबाबदार आणि गैरजबाबदार वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी मीरा-भाईंदर शहरातही आंदोलन करण्यात आले.तहसीलदार कार्यालय, टेंबा हॉस्पिटलजवळ, भाईंदर पश्चिम येथे ठाकरे गटाने आंदोलन केले . पथनाट्याच्या माध्यमातून मंत्र्यांच्या विविध वादग्रस्त कारनाम्यांवर प्रकाश टाकण्यात आला. पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री, हाती सिगारेट धरलेला मंत्री, तसेच पैशांनी भरलेली बॅग घेऊन फिरणारा मंत्री अशा प्रतिकात्मक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करण्यात आली. या वेगळ्या आंदोलनामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले.शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जनतेच्या पैशांचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्या मंत्र्यांना आता गप बसू देणार नाही. राज्यभर उभा राहिलेला जनअक्रोश सरकारला धडा शिकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ubt group agitation jan akrosh morcha against mahayuti govertment in alibaug and mira bhayander

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • maharashtra poliotics
  • Mahayuti Goverment
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय
1

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन
2

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?
3

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?

Mumbai :  अडीच वर्षात विकास प्रकल्पांतील स्पीडब्रेकर केले दूर ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
4

Mumbai : अडीच वर्षात विकास प्रकल्पांतील स्पीडब्रेकर केले दूर ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.