वर्धापनदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; दोन नेते सोडणार साथ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन तीन महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत कायमच शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. मात्र शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गट पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज शिवसेनेचा वर्धापनदिन असून दोन्ही गटाकंडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
“निष्ठेला विकत घेण्यासाठी अमिषाचा बाजार…; वर्धापन दिनी अंबादास दानवेंचे शिवसैनिकांना खुले पत्र
सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोमात तयारी सुरू केली आहे. शिंदेंच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे, विशेष करून मुंबईच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दोन्ही शिवसेनेची मुंबईसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते वर्धापनदिनाची जय्यत तयारी करत असताना उद्धव ठाकरे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या मातोश्रीच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
कालच ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक पार पलडी होती. याच बैठकीत उपस्थित असलेले दोन खासदार ठाकरे गटाला रामराम करणार आहेत. ठाकरे गटाचे दोन आणि शरद पवार गटाचा एक असे तीन माजी नगरसेवक आज वर्धापनदिन कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून अनेक दिवसांपासून माजी नगरसेवकांच्या बैठका घेतल्या जात होत्या.
दोन शिवसेनेचे दोन वर्धापन मेळावे; ठाकरे मनसेसोबत युती करणार की शिंदे स्वबळाचा नारा देणार?
दर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत मोठ्या संख्येने माजी नगरसेवक उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर पक्षाला लागलेली गळती थांबेल, असं मानल जात होतं. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन माजी नगरसेवकांनी रामराम ठोकला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.