Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Vijayi Melava: 19 वर्षांचा वनवास संपणार; राज-उद्धव आज एकत्र येणार!

मराठी अस्मितेच्या एकतेसाठी लाखो लोक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 05, 2025 | 11:40 AM
Uddhav Thackeray Vijayi Melava: 19 वर्षांचा वनवास संपणार; राज-उद्धव आज एकत्र येणार!
Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण मुंबईकरांसह  राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये आज (५ जुलै)  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत. तब्बल १९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वरळी डोममध्ये रविवारी ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार आहे.

मराठी अस्मितेच्या एकतेसाठी लाखो लोक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे.या मेळाव्याचे केंद्रबिंदू फक्त ठाकरे बंधू नव्हे, तर मराठी माणसाचा स्वाभिमान, संस्कृती आणि एकजूट असल्याचे मानले जात आहे. डोमच्या आत उसळलेली गर्दी आणि टाळ्यांच्या गजरात उमटणारे ‘जय महाराष्ट्र’चे घोष यामुळे वातावरण भारून गेल्याचे पाहायला मिळत आहे.आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आज मराठी बाणा एकत्र येतोय, ही भावना उपस्थितांमध्ये स्पष्ट जाणवली. “आमचं स्वप्न पूर्ण झालं,” असे सांगताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही होते.

राज-उद्धव ठाकरे बंधूंचा ‘विजयी मेळावा’! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल

वरळी डोमबाहेर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली आहे. गेटवर जनसागर उसळला असून, या गर्दीतून मार्ग काढणे नेत्यांनाही कठीण झाले आहे. मनसे आणि शिवसेनेचे अनेक नेते गर्दीत अडकले असून, काहींचा प्रवेश थांबलेला आहे. मनसेचे अविनाश जाधव आणि शिवसेनेचे प्रकाश महाजन हे दोघेही गेटवर अडकल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असला, तरी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दीचा रेटा इतका होता की नियंत्रण राखणे कठीण झाले.

डोममध्ये प्रवेश मिळावा यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू होती. पोलिसांनी कसाबसा मार्ग काढून काही प्रमुख नेत्यांना आत घेतलं, मात्र अजूनही शेकडो कार्यकर्ते बाहेरच अडकून आहेत.ही गर्दी केवळ राजकीय मेळाव्याची नसून, मराठी अस्मितेच्या एका महान क्षणाची साक्ष देणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

वरळी येथे होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्यासाठी पालघरहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अडवलं आहे. दादर परिसरात पोलिसांनी पालघर जिल्हाध्यक्ष तुलसी जोशी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

600 दशलक्ष वर्षांपूर्वी एक दिवस 21 तासांचाच होता! वैज्ञानिकांनी लावला थक्क करणारा शोध

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महत्त्वाच्या चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, मनसैनिकांना नेमकं कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतलं, याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

या कारवाईमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वरळीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात मनसैनिकांची हालचाल सुरू असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Uddhav thackeray vijayi melava 19 after 19 years of waiting raj uddhav will come together today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.