शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता कुडाळ शहरातील आरएसएन चौक येथे उध्दव ठाकरे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. जिजामाता चौक येथे नागरिक संवाद साधणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली. यावेळी उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, गटनेते अतुल बंगे, तालुका संघटक बबन बोभाटे, बंड्या कोरगावकर, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत हॅट्रिक करणार
यावेळी बोलताना संजय पडते म्हणाले की, उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ही प्रचाराची रणधुमाळी असून रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे हॅटट्रिक करतील असा दावा जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केला.
बाईक रॅलीचे आयोजन
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर ४ फेब्रुवारी रोजी येत आहेत. यादरम्यान कुडाळ तालुक्याच्या वतीने आरएसएन चौक येथे पक्षप्रमुखांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. तर आरएसएन चौक ते जिजामाता चौक यादरम्यान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर याचवेळी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून १५ दिव्यांग बांधवांना मोटारसायकलचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर जिजामाता चौक समोरील पटांगणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे नागरिकांशी संवाद साधतील असे यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले.
शिंदे गटाचे अस्तित्व कुठे?
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय पडते यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत शिंदे गटाचे अस्तित्व कुठे आहे असा प्रश्न विचारण्यात आला.
केसरकरांचे प्रोजेक्ट गेले कुठे?
तर यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री महोदयांनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन, चष्म्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन केले. मात्र, हे प्रोजेक्ट कुठे गेले असा प्रश्न विचारत मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.
निवडणूक तोंडावर आली असताना अद्याप भाजपचा उमेदवार ठरत नाही. यावेळी भाजपवर टीका करताना खासदारकीची निवडणूक तोंडावर आली असताना अद्याप भाजपचा उमेदवार ठरत नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊत हॅटट्रिक करतील असा दावाही यावेळी बोलताना संजय पडते यांनी केला.