Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी विकास विभागाच्या ‘सेंट्रल किचन’चे केद्रींय संरक्षण राज्य मंत्र्यांनी केले कौतुक ! रांचीतही राबविणार हा उपक्रम

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांकरिता आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचन या उपक्रमाची संरक्षण राज्य मंत्र्यांनी कौतुक केले. हा उपक्रम रांचीतही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

  • By नारायण परब
Updated On: Dec 26, 2024 | 08:37 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबवलेला सेंट्रल किचनचा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जात आहे. असे कौतुक संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले तर  हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंड सारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची येथे राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प (नंदुरबार) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. जिल्हा नियोजन अधिकारी अंकुश काळे, सेंट्रल किचनचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांच्यासह विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी आश्रम शाळांमधील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते

यावेळी सेंट्रल किचन या योजनेचे कौतुक करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ म्हणाले, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाने राबवलेल्या नंदुरबार येथील सेंट्रल किचन या योजनेबाबत आज जाणीवपूर्वक प्रत्यक्ष भेट देवून माहिती करून घेतली. एकाच स्वयंपाक घरातून शिजलेले अत्यंत स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टिक व उल्लेखनीय म्हणजे कडधान्येयुक्त अन्न आदिवासी आश्रम शाळांमधील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते आहे. आदिवासी मुलांमधील पोषण आहाराच्या समस्येवर परिणामकारक व परिपूर्ण अशी ही सेंट्रल किचन ची संकल्पना आहे. शिजवलेले अन्न अगोदर ज्यांनी तयार केले आहे, ते अगोदर चाखतात त्यामुळे त्या अन्नातील अत्यावश्यक घटक व पौष्टिकता तसेच प्रमाणबद्धता एकप्रकारे प्रमाणित केली जाते. त्यामुळे सकस आहारासाठीची मिड डे मिल ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पनेतील स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या निकषांवर आधारित त्रिसुत्री येथे प्रत्यक्षात यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी सांगितले.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी सकस आहाराचा आस्वादही घेतला

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण सेंट्रल किचन ची कार्यपद्धती जाणून घेतली. उपलब्ध यंत्रसामग्रीचा उपयोग करताना त्यातील अन्नधान्य व भाजीपाला यांची पौष्टिकता कशी जपली जाते, या बाबतचे बारकावेही त्यांनी जाणून घेतले. सेंट्रल किचनसाठी  काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच तेथे तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचा आस्वादही घेतला.

आदिवासी विभागाचा उपक्रम यशस्वी झाला आहे आणि संरक्षण राज्यमंत्र्यांनी या उपक्रमाच्या धर्तीवर लवकरच रांची येथे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितल्याने देशपातळीवर हा उपक्रम आपली वेगळी छाप पाडत आहे हे दिसून येते.

Devendra Fadnavis: सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल- देवेंद्र फडणवीस

 

Web Title: Union minister of state for defence lauds tribal development departments central kitchen initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 08:37 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
1

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?
2

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या
3

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
4

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.