Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update: शेतकऱ्यांनो सावध व्हा! राज्यात ‘या’ चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

Maharashtra Rain Update News : शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात चार दिवस वादळ पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2026 | 11:24 AM
शेतकऱ्यांनो सावध व्हा! महाराष्ट्रात चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता (फोटो सौजन्य-Gemini)

शेतकऱ्यांनो सावध व्हा! महाराष्ट्रात चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांनो सावध व्हा!
  • राज्यात ‘या’ चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता
  • काही भागात हलका ते मध्यम पाऊस
Maharashtra Rain Update News in Marathi: महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट तीव्र झाली आहे, बहुतेक जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान आहे. किनारपट्टीच्या भागात आर्द्रता जाणवत आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटाही अनुभवल्या जात आहेत. याचदरम्यान आता हवामान विभागाकडून राज्यात चार दिवस वादळ पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १३ आणि १४ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

‘या’ चार दिवसात वादळी पाऊस

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

Satara News: साताऱ्यात कचरा डेपोची आग नगरपरिषदेला महाग पडणार; ७ कोटींचे नुकसान, कंपनीवर कारवाईची मागणी

शेतकऱ्यांनो वेळीच सावध व्हा..

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मात्र काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

तापमानात सतत वाढ

पुणे हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सखा सानप यांच्या मते, पुण्यासह महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या, अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, तर पुण्यात आज ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

मुंबईसह किनारी भागातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे सकाळी काही भागात धुक्यासारखा थर दिसत होता, परंतु यामुळे कोणताही धोका नाही आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही. विदर्भातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा परिणाम

गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात चक्राकार वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे, ज्यामुळे अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसली तरी, विदर्भ आणि कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवू शकतात. हवामान खात्याने १४ मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा: मंत्रिमंडळानंतर आता विधानसभेची मोहोर? जाणून घ्या काय आहेत तरतुदी

Web Title: Thunderstorms likely in the maharashtra in 17 to 20 march 2026 farmers urged to take precautions news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • maharashtra
  • rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.