Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pratap Sarnaik News: प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्‍यांकडून घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2026 | 12:20 PM
ई-रिक्षां आणि ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-Gemini)

ई-रिक्षां आणि ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • ई-रिक्षां आणि ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी
Pratap Sarnaik News in Marathi : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना (ई-रिक्षा) प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासन अधिसूचना क्र. का. आ. २८१२ (अ) 30 जून 2016 अन्वये प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाईक साठीही परमिट (परवाना )प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार

दरम्यान, परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून “एक खिडकी योजना ” सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पाडली जाणार आहे. तथापि, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परमिट घेणे अनिवार्य राहणार आहे. नवीन नियमानुसार इलेक्ट्रिक रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट घेणे आवश्यक राहील, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत अधिक शिस्त येईल, नियमांचे पालन सुनिश्चित होईल आणि भविष्यात प्रवाशांना सुरक्षित व नियंत्रित सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

“भविष्यात हे परवाने गोर गरिबांना मिळावेत, राज्यात अनेक शेतकरी आहेत. त्यांना उपजीविकेचे इतर मार्ग मिळाले पाहिजेत. सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना काही व्यवसायासाठी इतर मार्ग मिळाले पाहिजेत किंवा काही उपाय योजले पाहिजेत, आम्ही त्यावर विचार करू. याद्वारे आम्ही एक SOP तयार करू. त्या SOP च्या आधारे, आम्ही मंत्रिमंडळाला प्रस्ताव सादर करू. बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू”, अशी महत्त्वाची माहितीही प्रताप सरनाईक यांनी दिली.

Maharashtra Politics: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा: मंत्रिमंडळानंतर आता विधानसभेची मोहोर? जाणून घ्या काय आहेत तरतुदी

 

Web Title: Decision to make permits mandatory for e rickshaws and e bikes as well says transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
4

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.