
सुमारे ४५ गावांत भातशेतीचे नुकसान
५०८ शेतकऱ्यांचे ९३.०४ हेक्टर क्षेत्र बाधित
अवकाळी पावसाचा खेडला मोठा फटका
खेड: तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.
काही दिवस हलक्या सरी बसरण्याची शक्यता
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा
परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून नींन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्…
४ दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होणार
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल.
येत्या चार दिवसात नुकसानीचा अहवाल पूर्ण होईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविंद माळी यांनी दिली.
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कापलेल्या भातशेती चे मीठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे या संकटातून शेतकरी वर्ग सावरणे कठीण आहे.
या परिस्थितीत शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे.
अशी प्रतिक्रिया मुरडे येथील शेतकरी प्रमोद हुमणे यांनी दिली.