Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिखलमय रस्ते आणि वाहतूक कोंडी; पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

ऐन पावसात वाहनचालकांना कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागला, तर दुचाकीस्वारांना भिजत प्रवास करावा लागला. याशिवाय, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या

  • By anuradha sagar
Updated On: Mar 31, 2026 | 05:45 PM
Pimpri-Chinchwad Rain Update, PCMC Infrastructure Failure,

Pimpri-Chinchwad Rain Update, PCMC Infrastructure Failure,

Follow Us
Follow Us:

PCMC Unseasonal Rain: अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीत पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली असून महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्यांनी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.सोमवारी (दि. ३०) दुपारी मेघगर्जना आणि गारांच्या सरींसह सुमारे एक ते दोन तास कोसळलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी पूर्णतः ठप्प झाला.

प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी

महापालिकेकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत. विशेषतः निगडी ते दापोडी मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने संत तुकारामनगर मेट्रो स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याचे दिसून आले. चिंचवड स्टेशन परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्या.पावसाळ्यापूर्वी नाले व गटारे साफ न केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. उघडी गटारे आणि चेंबरची झाकणे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडली आणि प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; 

मान्सूनपूर्व तयारीचा अभाव स्पष्ट

ऐन पावसात वाहनचालकांना कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागला, तर दुचाकीस्वारांना भिजत प्रवास करावा लागला. याशिवाय, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या, तर जोरदार वाऱ्यामुळे जाहिरात फलकांचे फ्लेक्स फाटून उडत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले.या संपूर्ण घटनेतून महापालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीचा अभाव स्पष्ट झाला असून, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

पुण्यातील अनेक भागांत  गारांचा वर्षाव

ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने दिलासा दिला. पाऊस अचानक आल्याने पुणेकरांची मोठी तारांबळही उडवली. सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झोडपून काढले. बाणेर, बालेवाडी व पाषाण, सुस परिसरात गारांचा वर्षावही झाला. दुपारपर्यंत निरभ्र असलेल्या आकाशाने सुमारे तीनच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि पावसाने जोर धरला.

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

सिंहगड रस्ता, नगर रोड, वडगाव शेरी, विमान नगर, चंदन नगर, कल्याणी नगर, लोहगाव, मुंढवा, केशवनगर, कोरेगाव पार्क, वाघोली, फुरसुंगी, औंध, डेक्कन, स्वारगेट आणि शिवाजीनगर या भागांत पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली. प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर पार्किंगमध्ये उभ्या वाहनांचे नुकसान झाले. रस्त्यावरील फेरीवाले आणि दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय झाली.

 

 

Web Title: Unseasonal rain exposes pcmcs pre monsoon failure pimpri chinchwad roads waterlogged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • PCMC News
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश
1

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे
2

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
3

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर
4

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.