“धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि अजित पवारांनी...”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
सोलापूर : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार वातावरण तापले आहे. तसेच अजित पवार गटाचे आमदार व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अगदी सत्ताधारी आमदार देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणत आहे. त्याचबरोबर देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये निवडणुकीची धामधुम असली तरी देखील मतदान घेण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या हॅकिंगवरुन राजकारण रंगले आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. तरी देखील या मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे.
शरद पवार गटाचे नेते व सोलापूरच्या माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सत्ताधारी भाजपवर तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ईव्हीएम मशीन हॅक केली जात असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केला आहे. उत्तम जानकर यांच्या मतदारसंघामधील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. यानंतर आता उत्तम जानकर म्हणाले की, निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो” असे मत आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे उत्तम जानकर म्हणाले की, “ईव्हीएम मशीन हे हॅक केले जात असल्याचे हे मी पुराव्यानिशी सांगतो. स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे, हे देशाला घातक आहे, सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर घातक आहे. निवडणूक आयोग हा भाजपसाठी “वाल्या ” म्हणूनच काम करत आहे. णत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठा हे चित्र तयार केले ते वाचणार नाहीत. जरी तुमच्या हातात आज सत्ता असली तरी कुठेतरी कृष्ण जन्माला येतोच,” असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर पुढे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मात्र धनंजय मुंडेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. आमदार जानकर म्हणाले की, “धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे. सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे,” अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे. मात्र टीका करताना त्यांचा तोल गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.