EVM हॅक होऊ शकतं का? निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी इलॉन मस्क यांना दिलं उत्तर
भारतात गेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर (EVM) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सत्ताधारी पक्ष ईव्हीएमशी छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. कॉंग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोंदीवर यावरून सातत्याने टीका केली आहे. दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्याला आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलं आहे.
भारतात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, एलॉन मस्क यांनी 15 जून 20224 रोजी केलेल्या ट्विटमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा, असं म्हटले होते. अशी कोणतीही मशीन कोणत्याही मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) हॅक केली जाऊ शकते.
We should eliminate electronic voting machines. The risk of being hacked by humans or AI, while small, is still too high. https://t.co/PHzJsoXpLh
— Elon Musk (@elonmusk) June 15, 2024
राजीव कुमार यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत या आरोपांना उत्तर दिले, मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणाचेही नाव न घेता हे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, एक तंत्रज्ञ आहेत, ज्यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते अमेरिकेत होऊ शकते, जिथे मतदान वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतींद्वारे केले जाऊ शकते. तिथली मशिन्स इंटरनेटशी जोडलेली आहेत. पण भारतात हे शक्य नाही. भारतातील ईव्हीएममध्ये छेडछाड करता येणार नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे हा आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट् विधानसभा निवडणुकीनंतर व्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला विरोध वाढतच चालला आहे. ईव्हीएमवर संशय असलेल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाओ कृती समिती’ची गेल्या महिन्यात स्थापना सुद्धा केली आहे. ‘मतदान पत्रिका नाही, तर निवडणूक नाही ‘ असा निर्धार व्यक्त करत या समितीनं ९ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
Delhi Election : सायंकाळी ५ नंतर मतदानाचा टक्का कसा वाढतो? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर
कृती समितीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. ईव्हीएमविरोधात निर्णायक जन उठाव घडवण्यासाठी विद्यार्थी आणि युवकांच्या एकजुटीतून ‘ईव्हीएम हटाओ कृती समिती’ स्थापना झाली आहे. आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू झाल्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतांमध्येही जिल्हा व तालुका पातळीवर अखंड आंदोलनं सुरू होतील, असं कृती समितीनं म्हटलं होतं. ९ फेब्रुवारी हा दिवस देशाच्या इतिहासात १९५१ सालात स्वतंत्र भारताच्या सुरू झालेल्या पहिल्या जनगणनेच्या प्रारंभाचा आहे, असं पत्रकात नमूद करण्यात आलं होतं.
या आंदोलनाचं लोण देशातील प्रत्येक राज्यात आणि कानाकोपऱ्यात पसरणार असून ईव्हीएम हटवून मतपत्रिका लागू केल्याशिवाय हा एल्गार आता मुळीच थांबणार नाही, असा निर्धार कृती समितीला पाठिंबा दिलेल्या अनेक संघटनांनी एका संयुक्त बैठकीत व्यक्त केला होता. या सर्व घडामोडींनंतर आज राजीव कुमार यांनी यावर खुलासा केला आहे.