'मला बदनाम करायचं ते करा,पण...'; पालकमंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा पलटवार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजप नेत्यांच्या भूमिकेवरून पक्षाची धारणा मुंडे यांच्याबाबत अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे, आणि त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित आरोप वाल्मि कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय सहकारी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंवरही आरोप होत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीही वाढणार असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीमान्याची मागणी लावून धरली आहे. तर भाजप आमदार सुरेश धस तर पहिल्या दिवसापासून थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत आहे. भाजप नेत्यांच्या भूमिका पाहिल्या तर मुंडेंसाठीही परिस्थिती फार काही अनुकूल नसल्याचेदिसून येत आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी सातत्याने लावून धरली आहे.
Dhananjay Munde News: राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
सुरेश धस दररोज नवनवे आरोप करत आहेत, पण भाजपकडूनही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. सुरूवातीला त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही या वादात ओढून ओढल्याने त्यावेळी पक्षाने त्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत विषय संपवला. पण धनंजय मुंडेवर गंभीर आरोप करत असताना मात्र भाजपने त्यांना मोकळीक कशी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील काही आरोप केले होते. बीडमधील गुंडगिरीविरोधात आवाज उठवल्याने अंजली दमानिया यांना धमक्या देण्यात आल्या होत्या.त्यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत बीड,परळीमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून धमक्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे मेसेजेस आल्याचा दावा केला. या धमक्या आणि शिवीगाळ केल्याचे त्यांनी काही पुरावेही सादर केले. त्यानंतर भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या अंजली दमानिया यांच्या मदतीला धावून गेल्या. चित्रा वाघ यांनीदेखील पोलिसात तक्रार दाखल केली. तर अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.
धक्कादायक ! स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची
धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप होत असताना काल त्यांनी उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याच्या बातम्याही पसरू लागल्या.माध्यम प्रतिनिधींना त्यांना राजीनामा देणार का, असा सवाल विचारला असता, आपण राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.