Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास

वनश्री दुध संघ यांच्या नुतन संचालकांची निवड व दुध उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी शेतकऱ्यांवर विश्वास व्यक्त केला.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 13, 2025 | 06:21 PM
Vanashree Milk Producers Farmers' Meet held in Islamabad bjp ravindra chavan participate

Vanashree Milk Producers Farmers' Meet held in Islamabad bjp ravindra chavan participate

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : नवनवे तंत्रज्ञान वापरून दूध उत्पादन कसे  वाढेल यासाठी प्रयोग करायला हवेत. जगभरात अनेक देशांनी दुग्ध व्यवसायात क्रांती केली आहे. वनश्री दूध संस्थेच्या माध्यमातून महाडिक बंधूनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक हातभार लावण्यासाठी योगदान दिले आहे.  राज्य आणि केंद्र सरकार मदतीसाठी नेहमीच पुढे असेल असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.

वनश्री दुध संघ यांच्या नुतन संचालकांची निवड व दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार झाला. विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले,” तीन तालुक्यातील १३० हून अधिक दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून दूध संकलित केले जात आहे.  वडिलांच्या स्मृती जपताना वनश्री या नावाने उभारलेल्या दूध संघाच्या माध्यमातून  दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी महाडिक बंधू यशस्वी झाले आहेत.  शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आदर्शवत काम करत आहेत.” अशा भावना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले,” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भावना घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आहे. सरकारच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. वनश्री दूध उत्पादक संस्थेचा विस्तार करण्यासाठी गरज लागल्यास मुंबई जिल्हा बँक अर्थ पुरवठा करण्यासाठी तयार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकार क्षेत्रामुळे झाला आहे. मात्र आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सहकारातील कारखानदारीचे खाजगीकरण झाले आहे. ग्रामीण भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा असणारा सहकार आता मोडकळीस आलाय की काय ? अशी परिस्थिती तयार झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये सहकाराची नेमकी काय अवस्था आहे ही जाणून घेण्याची आवश्यकता आता वाटू लागली आहे.” असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावेळी सम्राट महाडिक म्हणाले” काही मूठभर व्यापाऱ्यांच्या ताब्यात दूध धंदा गेला आहे. त्यांची मनमानी या व्यवसायात सुरू असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सरकारची पकड कमी झाली आहे. भेसळयुक्त दूध व इतर उपपदार्थ खुलेआम सरकारच्या परवानगीने बाजारपेठेत आहेत. सरकारने लक्ष देऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. वनश्री दूध डेरीच्या माध्यमातून प्रतिदिनी ४० हजार लिटर दूध  दूध संकलन केले जात आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरात विक्री केली जात आहे. आमची उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.”

आमदारकीचे स्वप्न आणि इच्छा !

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे. कमी वयामध्ये मला सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून नेतृत्वाची संधी दिली. आतां जिल्हाध्यक्ष म्हणून माझी काही मागणी नाही मात्र माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची इच्छा पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एका कार्यक्रमाचा दाखला देतांना अण्णा डांगे  यांनी भावी आमदार सम्राट महाडिक असा उल्लेख केल्याची आठवण करून दिली.
यावर आमदार प्रवीण दरेकर म्हणाले,” सम्राट बाबांचे आमदारकीचे स्वप्न मनातून जायला तयार नाही. आक्रमक नेते आहात.तुमचा आक्रमकपणा विधानसभेच्या निवडणुकीत जवळून पाहिला आहे. एक आमदार होण्यापेक्षा आपण जिल्ह्यातील अनेक आमदारांसाठी मार्गदर्शक आहात. मात्र कार्यक्रमात बोलताना महाडिक यांनी आमदारकी इच्छा असल्याचे बोलून दाखवताना अण्णासाहेब डांगे आप्पांनी इच्छा बदलू नये असे सूतोवाच केले.

Web Title: Vanashree milk producers farmers meet held in islamabad bjp ravindra chavan participate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • daily news
  • Islampur
  • political news

संबंधित बातम्या

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
1

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा
2

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’
3

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर
4

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.