Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

जिल्ह्यातील ९ नोंदणी कार्यालयांमार्फत नागरिकांना नोंदणीविषयक विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभकरण्याच्या दृष्टीने 'ई-प्रमाण' सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 05:10 PM
दस्तांच्या प्रमाणित प्रती 'ई-प्रमाण'वर

दस्तांच्या प्रमाणित प्रती 'ई-प्रमाण'वर

Follow Us
Follow Us:

अकोला : नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना नोदणीकृत दस्तांच्या प्रमाणित प्रती सहज, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-प्रमाण’ डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे केवळ प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज कमी होणार असून, नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि मनुष्यबळाची बचत होणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील ९ नोंदणी कार्यालयांमार्फत नागरिकांना नोंदणीविषयक विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभकरण्याच्या दृष्टीने ‘ई-प्रमाण’ सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या सेवेचा लाभ सामान्य नागरिकांसह विधिज्ञ, सनदी लेखापाल, दस्तलेखक, बँका व वित्तीय संस्था, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित व्यक्ती, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्था तसेच मालमत्ता व दस्तऐवजांचा शोध घेणाऱ्या लीगल व टायटल सर्च फर्म्सना घेता येणार आहे.

मालमत्तेच्या व्यवहारापूर्वी मालकी हक्काची तपासणी, पूर्वीचे व्यवहार, बोजा व हक्काशी संबंधित नोंदी, दस्तांची पडताळणी, बँक कर्ज प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे आणि टावरल सर्चसाठी आवश्यक असलेल्या नोंदणीकृत दस्तांच्या प्रमाणित प्रती मिळविण्याची प्रक्रिया यामुळे अधिक सुलभ होणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी उपयुक्त; मालमत्ता वाद, दिवाणी प्रकरणे, वारसाहक्क, खरेदी-विक्री व्यवहार, गहाणखत, हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, मुखत्यारपत्र, विकास करार, भाडेपट्टा आदी व्यवहारांशी संबंधित नोंदणीकृत दस्तांच्या प्रती अनेकदा आवश्यक असतात.

ई-सर्च सुविधेचाही उपयोग

आवश्यक दस्ताची माहिती शोधण्यासाठी उपलब्ध ‘ई-सर्च’ सुविधेचा नागरिक व संबंधित व्यावसायिकांना उपयोग करता येईल, आवश्यक माहिती मिळाल्यानंतर ई-प्रमाण’ सेवेद्वारे प्रमाणित प्रत मिळविता येणार आहे.

डिजिटल पद्धतीने प्रमाणित प्रती उपलब्ध झाल्याने दस्तऐवज हाताळणी, प्रतीक्षेचा वेळ आणि कार्यालयीन ये-जा कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी डिजीटल सेवा वापरताना अधिकृत विभागीय फेर्टलवाच वापर करावा. तसेच वैयक्तिक व व्यवहाराशी संबंधित माहिती अनधिकृत व्यक्ती किंवा संकेतस्थळावर देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भिगवणमधील निकृष्ट रस्ता कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल; अधिकाऱ्यांकडून पाहणी करून कंत्राटदाराला सूचना

संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या विधिज्ञ प्रतिनिधींना ‘ई-प्रमाण’ सेवेमुळे प्रमाणित प्रत मिळविणे सुलभ होणार आहे. बँका व वित्तीय संस्थांनाही गृहकर्ज, मालमत्ता तारण, कर्जवसुली, मालमत्तेच्या हक्काची तपासणी, बँक मंगिंज तसेच इतर वित्तीय व्यवहारांसाठी नोंदणीकृत दस्तांची पडताळणी करावी लागते. त्यामुळे ही सुविधा त्यांच्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Various services available through 9 offices in akola district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Aaple Sarkar
  • Government Scheme
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Free LPG Cylinder : एक दोन नाही तर थेट 6 सिलेंडर मिळणार फ्री, कसं काय? जाणून घ्या काय आहे योजना?
1

Free LPG Cylinder : एक दोन नाही तर थेट 6 सिलेंडर मिळणार फ्री, कसं काय? जाणून घ्या काय आहे योजना?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.