सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद (Solapur ZP) आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका बसला आहे. कोठे एससी तर कोठे ओबीसी महिला आरक्षण पडल्याने इच्छुक नेतेमंडळींचा हिरमोड झाला आहे.
सोलापूर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. सोडतीमध्ये जिल्ह्यातील मातब्बर नेतेमंडळी अडचणीत आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार मानले जातात. गेली पाच दशके त्यांनी जिल्हा परिषदेवर अधिराज्य गाजवले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज त्यांचे मतदारसंघ महिला सर्वसाधारण झाला आहे.
भाजप समविचारी आघाडी निर्माण जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणारे माजी सभापती विजयराज डोंगरे यांचा मोहोळ तालूक्यातील आष्टी मतदारसंघ एससी महिला राखीव झाला आहे. भाजपचे माजी पक्षनेता आनंद तानवडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील, रणजितसिंह शिंदे आदींचा मतदार आरक्षित झाला आहे.
नियोजन भवन येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड, कन्याकुमारी भोसले यांच्या उपस्थितीमध्ये प्रणिती गायकवाड या १२ वर्षांच्या मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचा करमाळा तालुक्यातील केम हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गंडांतर आले आहे. दुसरीकडे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा मंगळवेढा तालुक्यातील भोसे हा मतदारसंघ सुरक्षित राहिला आहे. मोहिते पाटील यांच्या मतदारसंघात बालेकिल्ल्यातील चारही मतदारसंघ खुले झाले आहेत.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत सदैव अग्रेसर राहणारे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांची निराशा झाली आहे. मतदारसंघ असलेला कुंभारी व भंडारकवठे हे दोन्ही मतदारसंघ महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. सांगोला तालुक्यात एकही जागा एससीसाठी राखीव यंदाच्या आरक्षण सोडतीत झाली नाही.
मंगळवेढा तालुक्यातील संतदामाजी नगर, संत चोखामेळा नगर हे दोन मतदारसंघ एससी महिला आरक्षित झाले आहेत. तर करमाळ्यातील वांगी, चिखलठाण, कोट्री हे तीन मतदारसंघ एससी आरक्षित करण्यात आले आहेत. ६८ गट असणारी जिल्हा परिषदेत यंदा ९ नवीन गट तयार करण्यात आले आहेत. ७७ संख्याबळ असणारी जिल्हा परिषद यंदा कार्यरत होणार आहे. दक्षिण सोलापूरातील होटगी मतरदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
करमाळा
पांडे, वीट- अनारक्षित, कोटी, चिखलठाण, वांगी अनुसूचित जाती, केम सर्वसाधारण महिला.
माढा
भोसरे अनुसूचित जाती महिला, म्हैसगाव सर्वसाधारण महिला, उपळाई (बु.)- नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी) लऊळ अनारक्षित, कुई – अनुसूचित जाती महिला, रांझणी सर्वसाधारण महिला, टेंभुर्णी सर्वसाधारण महिला, मोडनिंब अनुसूचित जाती.
बार्शी
उपळाई ठोंगे- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी), पागरी – सर्वसाधारण महिला, उपळे दुमाला, पानगाव, मालवडी अनारक्षित, शेळगाव (आर) अनुसूचित जाती महिला.
उत्तर सोलापूर
नान्नज, दारफळ बीबी सर्वसाधारण महिला, कोंडीअनारक्षित,
मोहोळ
आष्टी अनुसूचित जाती महिला, नरखेड, कामती (बु.) – सर्वसाधारण महिला, पोखरापूर अनुसूचित जाती, पेनूर अनारक्षित, .कुरुल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी),
पंढरपूर
भोसे अनारक्षित करकंब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रोपळे अनारक्षित, पुळूज- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गोपाळपूर, गुरसाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग, भाळवणी, वाखरी, टाकळी सर्वसाधारण महिला, कासेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग .
माळशिरस
दहीगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, फोंडशिरस नागरिकांचा मागास प्रवर्ग, संग्रामनगर, यशवंतनगर, माळीनगर, बोरगाव अनारक्षित, वेळापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मांडवे अनारक्षित, कन्हेर नागरिकाचा मागास प्रवर्ग, तांदूळवाडी अनुसूचित जाती प्रवर्ग. पिलीव अनारक्षित.
सांगोला
महूद (बु.), एखतपूर अनारक्षित, वाडेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, कडलास नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, अकोला, चोपडी, कोळा सर्वसाधारण महिला, घेरडी अनारक्षित.
मंगळवेढा
सत दादाजीनगर अनुसूचित जाती महिला हुलजंती नागरिकांचा मागास प्रवर्ग, संत चोखामेळा नगर- अनुसूचित महिला, नंदेश्वर – सर्वसाधारण महिला, भोसे अनारक्षित.
दक्षिण सोलापूर
बोरामणी सर्वसाधारण महिला वळसंग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कुंभारी सर्वसाधारण महिला, होटगी अनुसूचित जमाती महिला, हत्तूर सर्वसाधारण महिला, मदुप नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, भंडारकवठे सर्वसाधारण महिला,
अक्कलकोट
चप्पळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, वागदरी सर्वसाधारण महिला जेऊर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मंगरूळ सर्वसाधारण महिला, नागणसूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, सलगर, तोळनूर अनारक्षित,