Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidarbha Monsoon: विदर्भात अखेर मान्सूनची एंट्री; पण शेतकऱ्यांना हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला

Vidarbha Monsoon : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यावर्षी विदर्भात मान्सून साधारण दहा दिवस उशिराने दाखल झाला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच उर्वरित विदर्भात पावसा

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2026 | 03:25 PM
घाट विभागाला ऑरेंज, शहराला यलो अलर्ट

घाट विभागाला ऑरेंज, शहराला यलो अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • विदर्भात मान्सून साधारण १० दिवसांनंतर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाची हजेरी
  • येत्या २-३ दिवसांत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि उर्वरित विदर्भात पाऊस सुरू होण्याची शक्यता
  • शेतात किमान ७० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये
Vidarbha Monsoon : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या मान्सूनची अखेर विदर्भात एंट्री झाली आहे.विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तरीही हवामान विभागाने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.

विदर्भात १० दिवसांचा उशीर

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यावर्षी विदर्भात मान्सून साधारण दहा दिवस उशिराने दाखल झाला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच उर्वरित विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासकीय भवनाच्या कामात ‘अजित सृष्टी’चा समावेश करा; भाजप आमदाराची आयुक्तांकडे मागणी

पेरणीची घाई  करू नका

दरम्यान विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात पावसात काही दिवसांचा खंड पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. २८ जूननंतर दुसऱ्या टप्प्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये किमान ७० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. अपुऱ्या पावसात पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असही त्यांनी म्हटल आहे.

नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी

दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने नाशिकसाठी यलो अलर्ट जारी केला असून घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम 21 वर्षांपूर्वीही मिळणार; उच्च शिक्षण, विवाहासाठी अंशतः पैसे काढता येणार

राज्यातील मान्सूनची सद्यस्थिती

सध्या मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मोठा भाग मान्सूनला सुरुवात झाली आहे. पुढील सहा ते सात दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असून, पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पेरणीबाबत संयम बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसांतील पावसाची सातत्यपूर्ण स्थिती खरीप हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे.

 

 

 

Web Title: Vidarbha monsoon arrival imd advises farmers against early sowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.