Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी, व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज : विजय वडेट्टीवार

  • By युवराज भगत
Updated On: Nov 18, 2023 | 10:26 PM
राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास लिहिले गेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. लेखणीला मर्यादा आल्याचे जाणवते. कुणालाही झुकविण्याची ताकद व्हाॅईस ऑफ मीडियात आहे. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज असल्याचे गौरवोद्गार विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढले.

व्हाईस ऑफ मीडियाचा राज्याचे शिखर अधिवेशनाचे शानदार उद्घाटन

पत्रकारांच्या न्याय हक्काचं व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचा राज्याचे शिखर अधिवेशनाचे शानदार उद्घाटन ग.दि.मा. सभागृहात भरगच्च उपस्थितीत पार पडले. उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार लाभले. तर सुनेत्रा पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील , ज्येष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, महेंद्र पिसाळ, व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, (उपाध्यक्ष मंदार फणसे, ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, माजी आमदार रामराव वडकुते, राज्य उपाध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक अजितदादा कुंकूलोळ, बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव व महेंद्र पिसाळ यांचे देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती.

यावेळी विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले,

“दर्पण म्हणजे जसाच्या तसा”, पण आता स्वरूप बदलल आहे. असे असले तरी या क्षेत्राची ताकद कायम आहे. कॉर्पोरेट हे क्षेत्र होत असल्याने बंधन वाढत आहेत. दिलखुलास लिहिता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे दर्पणकाराना अभिप्रेत आरश्यावर डाग मात्र तेवढे वाढले आहेत.
सुनेत्राताई येथे अधिवेशनाला आल्या. त्यामुळे अजित दादा पर्यंत पत्रकारांचा व्यथा, वेदना, मागण्या पोचतील. पत्रकारांची व्यथा मोठी आहे.

पत्रकारांनी सामान्यांच्या व्यथा वेचून मांडाव्यात

सूत्रांच्या अर्थाने होणारी सोयी ची पत्रकारिता बदलली पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारिता मजबूत असली पाहिजे. निकोप लोकशाहीसाठी खरी पत्रकारिता व्हावी. लोकमान्य टिळकांच्या त्या काळच्या अग्रलेखा चा हवाला देत सरकारच डोकं ठिकाणावर आहे का हे विचारण्याचा धाडस देखील आता जगल पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संध्याकाळी पाच वाजता सुद्धा मंत्रालय समोर उभी असलेली सामान्यांची मोठी रांग पहिली की खंत वाटते. तेव्हा प्रश्न संपले की वाढले याचा विचार होणे गरजेचे आहे. तेव्हा पत्रकारांनी सामान्यांच्या व्यथा वेचून मांडाव्यात असेही वडेट्टीवार म्हणाले.

सुनेत्रा पवार अन् अजित दादांच्या संदेश….

यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपुख्यमंत्री अजितदादा उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती दिली. दरम्यान अजितदादा यांचा शुभेच्छासह अपेक्षावजा संदेश त्यांनी वाचून दाखवला. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत बारामती निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. विकासाचे माॅडेलची पाहणी करावी. चौथा स्तंभ म्हणून बारामतीची पाहणी करावी, दुरुस्ती सुचवावी. मिडीयाचा वेग प्रचंड वाढला आहे. सोशल मिडिया चा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. माध्यमांनी विश्वासार्हतेबाबत गांभिर्याने काम करण्याची गरज असल्याचा संदेश दिला.

२८ हजार पत्रकारांचा विमा काढला

पत्रकारांच्या व्यथा सरकार दरबारी पोहचवू, असे आश्वासन खा. हेमंत पाटील यांनी यावेळी दिले. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले,व्हाईस ऑफ मीडियाचे आज ३७ हजार सदस्य आहेत. मागच्या दोन वर्षात देशभरात २८ हजार पत्रकारांचा विमा काढला. येत्या दीड वर्षात व्हाईस ऑफ मीडियाची सदस्य संख्या ३ लाखाच्या वर जाईल याची खात्री आहे. आजपासून आंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करायची असल्याचे व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगीतले.

हिंगोलीतील घरासाठी ५ लाखांचा निधी…

प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरे बांधून देण्यात यावे यांसाठी व्हाईस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला आहे. हिंगोलीच्या पत्रकारांसाठी घरे बांधून देण्यासाठी खा. हेमंत पाटील व हिंगोलीच्या पालकमंत्री अब्दुल सत्तर यांनी ५ लाख रुपयांचा निधी दिला. सदर चेक सुनेत्रा पवार, खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते हिंगोलीच्या व्हाईस ऑफ मीडियाच्या टीम कडे सुपूर्द करण्यात आला. सूत्रसंचालन महिलाविंग च्या राज्याच्या कार्याध्यक्ष फराह खान यांनी केले.

Web Title: Vijay vadettiwar said pure democracy should be maintained by journalists voice of media is light of life of journalists nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2023 | 10:26 PM

Topics:  

  • baramati news
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

‘गुरुजी’ अडकले हनीट्रॅपमध्ये; महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही कपडे काढले…
1

‘गुरुजी’ अडकले हनीट्रॅपमध्ये; महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही कपडे काढले…

Arjun Khotkar Atrocity case : अर्जुन खोतकर यांना एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करणं भोवलं! अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
2

Arjun Khotkar Atrocity case : अर्जुन खोतकर यांना एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करणं भोवलं! अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
3

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार
4

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.