
Congress Vijay Wadettiwar Press Conference on Nagar parishad Election Result 2025
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार आमरण उपोषण आणि आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला कोंडीत पकडणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता आपली रणनीती बदलली आहे. सध्या जरांगे पाटीलांचे लक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसकडे वळले असून, त्यांच्या आंदोलक कृतींचा टार्गेट बदलल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी असा इशारा दिला की, जरांगे पाटीलांच्या हालचालींमुळे राजकीय रणभूमीवर परिणाम होऊ शकतो.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी संदर्भातील तपास आता तीव्रतेने सुरू होणार आहे. मागील काळात काही मराठा युवकांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यासंदर्भातील तपास नीट झाला नव्हता; तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. सरकारच्या तपासाच्या या हालचालींचे स्वागत होत असून, यावरून ओबीसी समाजाविषयी सरकारचे प्रेम स्पष्ट दिसून येते, अशी प्रतिक्रीया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओबीसी तरुणाची आत्महत्या झाली असताना त्यालाही ‘मराठा’ म्हणून संबोधण्यात आले होते. यावरून गंभीर आरोप केला जातो की, ओबीसी तरुणांचा सरकारनेच खून केला असल्याचे दिसते. तसेच आरक्षणाबाबत समाजामध्ये निर्माण झालेल्या भावना, आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या वेदना याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. काही माध्यमांच्या माध्यमातून असा आरोप केला जात आहे की, सरकार ओबीसींचे आरक्षण हटवण्याचा प्रयत्न करत आहे.’ असंही त्यांनी सांगितलं.
संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने कोणताही निर्णय कायद्याच्या चौकट मोडून घेणे शक्य नाही, असे मानले जात आहे. या सुनावणीत न्यायालयाला पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरणारा निर्णय देण्याची संधी आहे.
ओबीसी नेत्यांच्या भूमिकेसंदर्भातही त्यांनी आपली भूमिका मांडली. “आम्ही ज्या समाजाच प्रतिनिधित्व करतो, ज्या समाजाने आम्हाला आमदार, लोकप्रतिनिधी केले आहे, त्या समाजासाठी लढणं, त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणं, हे आमचे कर्तव्य आहे, हे कोणाला मान्य होत नसेल, तर त्याने त्यांची भूमिका मांडावी. आमच्यावर कोणी अन्याय करत असेल आणि आम्ही बघ्याची भूमिका घ्यावी असं कोणाला वाटत असेल तर आम्ही काही थांबणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. नागपुरच्या ओबीसी समाजाच्या मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘हा माझा मेळावा नाही, सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे. कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. माझ्या नेतृत्वात मोर्चा नाही. कार्यकर्ता म्हणून मी त्यात लढतो आहे. मोर्चासाठी सर्वांना आमंत्रण आहे, ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी त्या मोर्चात यावं.
पती परदेशात असताना पत्नी गर्भवती; फेसबुक लाईव्ह करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महापालिकेची निवडणूक आहे, म्हणून अपूर्ण असलेल्या टर्मिनल आणि विमानतळाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होत आहे. रेगुलर फ्लाईट डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. विमानतळ अजूनही पूर्ण झालेले नाही. मग आतापासून उद्घाटनाचा अट्टाहास कशाला, महापालिका निवडणुकीत फायदा घेण्यासाठी उद्घाटनाचा आयोजन केलेला आहे. निवडणुकीत फायदा घेण्यासाठीची युक्ती आहे. अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, पंतप्रधान आता महाराष्ट्रात आले आहे, तर त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरून मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.