Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

बाळू मामा दर्शनात सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन होणार असल्याने रांगेतून बाळूमामांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2025 | 10:53 AM
संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

Follow Us
Close
Follow Us:

गारगोटी : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवालय समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाळूमामाच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी गाभारा आणि त्यासमोरील विशेष दर्शन व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे.

बाळू मामा दर्शनात सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन होणार असल्याने रांगेतून बाळूमामांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन, मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घ्यावे लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून, दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व श्रीफळ, प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था आहे.

दरम्यान, सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी व सदस्यांनी दिली.

श्रीक्षेत्र आदमापूर बाळूमामा यांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, रोज रांगा लागत आहेत. सर्व भाविकांना दर्शन सुलभपणे घेता यावे यासाठी दर्शन रांगासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. व्हीआयपी दर्शन बंद निर्णय घेतला असला तरी अपवाद वगळता मंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांना देवस्थान समितीने त्या-त्या प्रसंगानुसार दर्शन दिले जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदमापूर ग्रामस्थांना सकाळी सात ते दहापर्यंत विना रांग समोरून दर्शन दिले जाणार आहे.

आदमापूर परिसरात काही ठिकाणी हॉटेल, दुकानासमोर बाळूमामांचे पुतळे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे श्री मामांच्या प्रतिमेला बाधा पोहचू शकते. श्री बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र राखले जावे. त्यासाठी असे पुतळे ठेवण्यास देवस्थान समितीने बंदी घालण्याचा निर्णय ही घेतला आहे.

– देवालय समिती, आदमापूर.

Web Title: Vip darshan at sant balumama temple closed now all devotees will be treated equally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प
1

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती
2

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत
3

Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत

Kolhapur News : शूटिंग रेंज खासगीकरणाला तीव्र विरोध; जिल्हा प्रशासनाविरोधात संताप
4

Kolhapur News : शूटिंग रेंज खासगीकरणाला तीव्र विरोध; जिल्हा प्रशासनाविरोधात संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.