Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: विराट कोहलीला साताऱ्याच्या मधाची भुरळ! कोरेगावच्या मधुपुष्पहनीच्या ५० पेट्या अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना

Virat Kohli Anushka 50 Bee Boxes Madhupushp Honey Alibaug Farmhouse : साताऱ्यातील सतीश शिर्के आणि प्रतीक कर्पे यांच्या मधुमक्षिका पालन व्यवसायातून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबाग फार्महाऊससाठी मधमाशांच्या पेट्या खरेदी केल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 04:57 PM
Virat Kohli Anushka 50 Bee Boxes Madhupushp Honey

Virat Kohli Anushka 50 Bee Boxes Madhupushp Honey

Follow Us
Follow Us:
  • कोरेगावच्या युवा उद्योजकांची मोठी झेप
  • विराट कोहलींच्या फार्महाऊससाठी साताऱ्यातून ५० मधमाशी पेट्या
  • ५० पेट्या अलिबागला रवाना
सातारा : सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोन होतकरू युवकांच्या मधुमक्षिका पालन व्यवसायाची दखल थेट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने घेतली आहे. कोरेगाव येथील सतीश शिर्के आणि प्रतीक कर्पे या दोन तरुणांकडून विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मधमाशांच्या पेट्या खरेदी केल्या आहेत. अलिबाग येथील त्यांच्या फार्म हाऊसवर या मधमाशा परागीभवनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी गावचे सतीश शिर्के आणि बोरजाईवाडीचे प्रतीक कर्पे या युवा उद्योजकांनी आठ वर्षांपूर्वी अत्यंत छोट्या प्रमाणावर मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मधमाशी पालन करण्यावर भर दिला. याच ऑरगॅनिक व्यवस्थापनाची माहिती विराट कोहली यांच्या टीमपर्यंत पोहोचली. अलिबाग येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर नैसर्गिक शेती केली जाते. तेथील पिकांचे उत्पन्न हे रसायनांवर नव्हे, तर नैसर्गिक परागीभवनावर अवलंबून असावे, या उद्देशाने कोहली दाम्पत्याने या तरुणांकडून मधमाशी पेट्या घेण्याचा निर्णय घेतला. कोरेगावसारख्या छोट्या तालुक्यातून सुरू झालेला व्यवसाय थेट राष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटीच्या फार्म हाऊसवर पोहोचल्याने युवा उद्योजकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिद्द, सातत्य आणि ऑरगॅनिक कामाला नेहमीच किंमत मिळते, हेच या दोन युवकांनी दाखवून दिले आहे.

मधमाशांमुळे उत्पादनात होणार वाढ

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. खतांचा मारा करून उत्पादन वाढले तरी आरोग्याचे धोके उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधमाशांचे पालन करून त्यांच्या माध्यमातून परागीभवन करून शेतीचे उत्पादन वाढविण्याची ही अनोखी संकल्पना आहे. यासाठी तब्बल 50 पेट्या अलिबागला पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेटीमध्ये आठ ते बारा हजार मधमाशा असतात. या मधमाशांच्या माध्यमातून वीस ते तीस टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवऊन विराटला मिळाली माहिती

सेंद्रिय उत्पादनांना ऑनलाइन मागणी अधिक असल्यामुळे सतीश शिर्के आणि प्रतीक कर्पे यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात डिजिटल प्लॅटफॉर्मवर केली. या माध्यमातूनच कोहली यांच्या व्यवस्थापकांना या मधाची माहिती मिळाली. फार्म शेतीचे उत्पन्न वाढविण्याची चर्चा झाल्यानंतर मधुमक्षिका पालन हा विषय पुढे आला आणि कोरेगावच्या या उद्योजकांचा शोध घ्यायला सुरुवात झाली.

विराट कोहली यांच्या अलिबागच्या फार्म हाऊसवर मधमाशा आता फळबागा आणि भाजीपाल्याचे नैसर्गिक पद्धतीने परागीभवन करून उत्पादनात वाढ करणार आहेत. शेतीमध्ये मधमाशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळे केवळ मधच मिळत नाही, तर पिकांची गुणवत्ता आणि उत्पन्न ३० ते ४० टक्क्यांनी वाढते. – सतीश शिर्के, मधुमक्षिका उत्पादक

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी

Web Title: Virat kohli anushka bought 50 bee boxes madhupushp honey satara pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Alibaug
  • Anushka Sharma
  • honey
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

PHOTOS: अमित मिश्राने उडवली खळबळ; Virat अन् कुंबळेवर केले ‘हे’ आरोप
1

PHOTOS: अमित मिश्राने उडवली खळबळ; Virat अन् कुंबळेवर केले ‘हे’ आरोप

भारतीय क्रीडाविश्वात भयंकर खळबळ! Virat अन् ‘या’ खेळाडूने Amit Mishra चे करियर संपवले? प्रकरण काय?
2

भारतीय क्रीडाविश्वात भयंकर खळबळ! Virat अन् ‘या’ खेळाडूने Amit Mishra चे करियर संपवले? प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.