
Voting process for Parbhani local body elections complete Nanded News
Maharashtra Local Body Elections : परभणी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या (Local Body Elections) अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील पूर्णा गंगाखेड, सेलू, पाथरी, मानवत जिंतूर आणि सोनपेठ नगरपरिष निवडणूकीसाठी मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाव लाभला. मंगळवारी (दि.३ सकाळी ७.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० पर्यंत एकूण झाले. सरासरी ५२.९८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही मतदानासाठी मतदारांनी अनेक उशिरापर्यंत केंद्रावर रांगा लावल्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी मिळण्यास विलंब झाला.
दुपारी ३.३० पर्यंत ५२.९८ टक्के मतदान
निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार एकूण सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील नगरपरिषद निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. पूर्णा- ४७.२ टक्के, गंगाखेड – ४८.३ टक्के, सेलू- ५१.३७ टक्के, पाथरी-५८.६५ टक्के, मानवत ४९.३ टक्के, जिंतूर-५८.२८ टक्के आणि सोनपेठ ६२.४५ असे एकूण परभणी जिल्ह्यात सरासरी ५२.९८ टक्के मतदान झाले.
हे देखील वाचा : नांदेड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा; वाढते खून-दरोडे बनले आहेत चिंतेचा विषय
पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ
पूर्णा नगरपरिषद निवडणुकीसाठी पूर्णा शहरातील ३८ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान सुरळीत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ९ मधील अण्णाभाऊ साठेनगर आणि भीमनगर येथील भैय्यासाहेव आंबेडकर हॉल येथे ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघाड झाला. जवळपास २० मिनिटे ईव्हीएम बंद राहिल्याने रागेत उभ्या असलेल्या मतदारांची चांगलीच पंचाईत झाली. प्रशासनाच्या डिसाळ तयारीबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. याच केंद्रावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बोगस मतदानाचा संशय व्यक्त झाल्याने स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झाली होती; मात्र पोलिस व निवडणूक प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण
यंत्रणांकडून वादाशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा अनोखा प्रयत्न
त्यामुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत पूर्णा शहरातील मतदानाची गती मध्यम स्वरूपाची राहिली. एकूण ३३,७७४ मतदारापैकी १५.९२० मतदारानी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी ४७.२% एवढी नोंदवली गेली. संध्याकाळपर्यंतही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या राया दिसत होत्या. विशेषत प्रभाग क९ मधील अण्णाभाऊ साठेनगर व भैय्यासाहेब आंबेडकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.