
गडहिंग्लजमध्ये भाजप स्वबळावर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर शिवसेना-काँग्रेसची काही गटात युती
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समितीच्या गणांसाठी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने स्वबळावर सर्वच गटात आपले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन त्यांनी आघाडीनुसार जागा वाटप करून घेतले आहे. ठाकरे शिवसेना व काँग्रेस यांची काही ठिकाणी युती झाली आहे.
काही ठिकाणी ते एकमेकांविरुद्ध लढत देत आहेत. जनसुराज्यने केवळ नूल गटामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी उमेदवार दिले आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटना हलकर्णी जि. प. गटात, तर शिवसेना शिंदे गट नेसरी जि.प., हलकर्णी जि.प., नूल जि. प. मध्ये लढत आहे. थेट प्रचाराला वेग आला असून संपर्क मोहिमा गतिमान झाल्या आहेत.
हेदेखील वाचा : Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…
पाच गटांसाठी एकूण ५४ जणांचे अर्ज दाखल होते. एकूण ३४ जणांनी माघार घेतल्याने २० जण रिंगणात राहिले. दहा गणांसाठी १०६ पैकी तब्बल ६७ जणांनी माघार घेतल्याने ३९ जण रिंगणात राहिले आहेत.
नूल गटात चौरंगी लढत
नूल गटात संतोष तेली (भाजप), तेजस्विनी पाटील (राष्ट्रवादी), सुदर्शन बाबर (शिवसेना), अनिरुद्ध रेडेकर (जनसुराज्य शक्ती) यांच्यामध्ये चौरंगी सामना होत आहे. नूल गणासाठी शिवगोंडा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) सागर मांजरे (शिवसेना), प्रियांका यादव (भाजप), मल्हार शिंदे (जनसुराज्य) व लगमान्ना नवलाज (अपक्ष) हे रिंगणात असून, गणासाठी पंचरंगी लढत होत आहे. हसुरचंपू गणात प्रशांत अर्नाळकर (भाजप), प्रभावती बागी (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण दावणे (जनसुराज्य शक्ती), अर्जुन दुंडगे (बंचित) अशी चौरंगी लढत होत आहे.
हलकणीमध्ये पंचरंगी सामना
हलकर्णी गटासाठी इरगोंडा पाटील (भाजप), डॉ. गंगाधर व्हसकोटी (शिंदे शिवसेना), डॉ. रियाज शमनजी (ठाकरे शिवसेना)
लक्षवेधी लढती
गिजवणे गटात शैलजा सतीश पाटील, प्रा. पौर्णिमा दिग्विजय कुराडे यांच्यात रस्सीखेच होणार आहे. हलकर्णी गटातून शिवशंकर राजकुमार हतरगी, रियाज शमनजी, राजेंद्र गड्डणावर यांच्यात देखील चुरशीची लढत होत आहे. नेसरी गटातून संग्रामसिंह कुपेकर व गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांच्या मध्ये देखील जोरदार लढत होत आहे. भडगाव मधून श्रीशैल पाटील व अमर चव्हाण यांच्यात थेट लढत होत आहे. नूल गटात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अनिरुद्ध रेडेकर आपले नशीब आजमावत आहेत.