गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या टोळीने एका घराचे दाराचे कडी-कोंडा तोडून दागिने, रोख रक्कम व साहित्य असा एकूण १ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ५१ वर्षीय महिला (रा. घर क्रमांक ३८, आशीर्वाद कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख ५० हजार रुपये, चांदीचा एक जग, सात ग्लास व देवाची मूर्ती (किंमत ६० हजार रुपये), सोन्याच्या दोन अंगठ्या (किंमत ७० हजार रुपये), मनगटी घड्याळ (किंमत ५ हजार रुपये), संगणकाचे पॉवर सप्लाय युनिट (किंमत १ हजार ५०० रुपये) असा एकूण १ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.