Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वनविभाग पिंजतोय जंगल; नर वाघाचा मुक्तसंचार, १० गावांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

वाठोडा परिसरात नर वाघाच्या हालचाली वाढल्याने वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला असून १० गावांतील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 04:31 PM
वनविभाग पिंजतोय जंगल; नर वाघाचा मुक्तसंचार, १० गावांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

वनविभाग पिंजतोय जंगल; नर वाघाचा मुक्तसंचार, १० गावांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो : वाठोडा शिवारात वाघाची हालचाल होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रादेशिक वनविभाग अॅक्शन मोडवर आला आहे. शिवाय परिसरातील १० गावांना वनविभागातर्फे खबरदारीचा इशाराही देण्यात आला. मुक्तसंचार करणारा वाघ हा ३ वर्ष वयोगटातील आणि नर असल्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा असून त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सध्या परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत.

वाघाचा मुक्तसंचार होत असल्याने वर्धा जिल्ह्यातील वाठोडा, धामणगाव, आमला, वाघधरा, बेलगाव, झाडगाव, लोणसावळी, शेकापूर, जोगाधरी, वायफड या गावातील नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या सूचना वनविभागाच्यावतीने दिल्या जात आहे. तर दुसरीकडे संबंधित वाघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जंगल पिंजून काढत आहे. संबंधित वाघाने वाठोडा येथील तीर्थराज झाडे यांच्या मालकीच्या कालवडीचा फडशा पाडला. ज्या ठिकाणी वाघाने कालवडीला ठार केले, त्या ठिकाणी वनविभागाच्यावतीने ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता. याच ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैदही झाला. पण नंतर तो जंगलाच्या दिशेने निघून गेला.

Wardha News: जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध …

मानव-वन्यजीव संघर्ष टळावा म्हणून वनविभागाच्यावतीने नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. याच सूचनांचे पालन नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत करणे गरजेचे असून तसे आवाहनही वनविभागाच्यावतीने केले जात आहे. हा वाघ आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वाठोडा, धामणगाव, आमला परसोडी भागात आला असावा, असा अंदाजही सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून वनविभागाच्यावतीने विशेष दक्षता घेत गस्त वाढविण्यात आली.

नागरिकांकडून सूचनांचे पालन गरजेचे

वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, क्षेत्र सहाय्यक जाधव, वनरक्षक माधव माने, वनरक्षक एस. सिद्दिकी, वनरक्षक पारस बडदे, अश्पाक पठाण, धनराज मजरे आदी सध्या वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगल पिंजून काढत आहे. तर मानव-वन्यजीव संघर्ष टळावा म्हणून वनविभागाच्यावतीने परिसरातील १० गावांमधील नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. याच सूचनांचे पालन नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत करणे गरजेचे असून तसे आवाहनही वनविभागाच्यावतीने केले जात आहे.

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार

Web Title: Wardha tiger movement wathoda forest department alert 10 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Forest Department
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.