Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी

हिंगणघाटमधील विदर्भातील सर्वांत मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत यंदा एक खास नोंद झाली आहे. प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या दोन नव्या पाणपक्षी प्रजातींनी येथे घरटी बांधल्याचे आढळून आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 03:02 PM
Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी

Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी

Follow Us
Follow Us:
  • हिंगणघाटच्या पाणपक्षी विणवसाहतीत यंदा प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या दोन नव्या प्रजातींची घरटी आढळली.
  • २०२५ मध्ये या विणवसाहतीत तब्बल १,०७३ पाणपक्ष्यांची घरटी नोंदवण्यात आली होती.
  • पक्ष्यांच्या सुरक्षित प्रजननासाठी परिसरात ध्वनी प्रदूषणावर निर्बंध घालण्याची मागणी पक्षी अभ्यासकांनी केली आहे.
हिंगणघाट: विदर्भातील सर्वांत मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत (हेरॉनरी) यंदा प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी आढळून आली आहेत. या दुर्मिळ नोंदीमुळे पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि उपअभियंता कार्यालय परिसरातील वृक्षांवर दरवर्षी शेकडो पाणपक्षी प्रजननासाठी घरटी बांधतात. निसर्गसाथी ग्रुपतर्फे या विणवसाहतीचे नियमित निरीक्षण व घरट्यांची गणना केली जाते. २०२५ मध्ये झालेल्या २ टप्प्यांतील गणनेत एकूण १,०७३ घरटी नोंदविण्यात आली होती. यावर्षी (२०२६) पहिल्या टप्यातील गणना पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील गणना सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे.

Raigad News: नेरळ ग्रामसभेत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला विरोध; आधी १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा हिशेब द्या, ग्रामस्थांची

आतापर्यंत या विणवसाहतीत छोटा बगळा, गाय बगळा, रातढोकरी, छोटा पाणकावळा आणि भारतीय पाणकावळा या ५ पाणपक्षी प्रजाती नियमितपणे प्रजननासाठी घरटी बांधत होत्या. मात्र, यंदा प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या २ प्रजाती परिसरात दिसून आल्याने त्या येथे घरटी बांधतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरत दोन्ही प्रजातींनी येथे यशस्वीपणे घरटी बांधली आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

या उल्लेखनीय नोंदीबद्दल पक्षी अभ्यासक राहुल वकारे, एम. एस. आर. शाद, अशोक भानसे, पंचशील थुल, ज्ञानचंद गहरवाणी, पवन दरणे, चित्रा इंगोले, प्रमोद इंगोले, यशवंत शिवणकर, प्रशांत भोयर, समीर बक्ष, शेखर जामूनकर, संतोष धनरेल, गणेश पोलकडे, अमित जोगे यांच्यासह विदर्भातील अनेक पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला. हिंगणघाटकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पक्ष्यांच्या शांततापूर्ण व सुरक्षित प्रजननासाठी विणवसाहतीच्या परिसरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वन विभागाने डीजे, फटाके आणि इतर मोठ्या आवाजाच्या साधनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी निसर्गप्रेमी व पक्षी अभ्यासकांनी केली आहे.

Mumbai Handloom Exhibition 2026: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नाबार्डचा उपक्रम; मुंबईत तीन दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन

परिसर सुरक्षित, शांत आणि प्रजननासाठी अनुकूल

निसर्गसाथी ग्रुपचे पक्षी अभ्यासक प्रवीण कडू यांनी सांगितले की, या दोन्ही नव्या प्रजातींनी हिंगणघाटच्या विणवसाहतीची निवड केल्याने हा परिसर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित, शांत आणि प्रजननासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या विणवसाहतीचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या निरीक्षणादरम्यान मध्यम बगळ्याची पिले घरट्याबाहेर आल्याचे, तर मोठा बगळा अद्याप अंड्यांवर बसून उबवणी करत असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रजातींचे यशस्वी प्रजनन होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Hinganghat bird colony records two new waterbird species for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • birds
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
1

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
4

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.