Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर; ४३ ठिकाणी धाडी, ६७ सिलिंडर केले जप्त

वर्धा जिल्ह्यात हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागाने ४३ ठिकाणी कारवाई करत ६७ सिलिंडर जप्त केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 02:46 PM
Gas Cylinders

Gas Cylinders

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे अनेक व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर केल्या जात आहे. पुरवठा विभागाने अलीकडील काळात केलेल्या कारवाईत ४३ ठिकाणी धाडी टाकून एकूण ६७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले, पण सध्या ही धडक कारवाई मोहीम थंडबस्त्यात पडली आहे.

हटिल, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थ विकणारे हातगाडे तसेच अन्य खाद्य व्यवसायांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर शासनाकडून नाममात्र का होई ना पण अनुदान दिले जाते. शिवाय, तो केवळ घरगुती वापरासाठीच आहे. मात्र, खर्च कमी करण्याच्या उद्देशाने काही व्यावसायिकांकडून त्याचा सर्रास व्यावसायिक वापर केला जात असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागात बघावयास मिळत आहे.

३ हजार रुपये मोजावे लागतात व्यावसायिक सिलिंडरसाठी

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली वाढ हे या प्रकारामागील मुख्य कारण मानले जात आहे. पूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी २,००० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता त्यासाठी ३,००० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडरचा वापर करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

‘तो’ प्रकार अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन

सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी मध्यंतरी पुरवठा विभागाकडे जिल्ह्यात विविध भागात तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. शिवाय संबंधिताविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर हा अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन करणारा प्रकार आहे.

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर हा प्रकार अत्यावश्यक वस्तु, कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. मध्यंतरी ४३ ठिकाणी छापे टाकून एकूण ६७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. कुठे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाला माहिती द्यावी. तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.”

Wardha News : भोसा बंधाऱ्याने बुडवला खरीप हंगाम, कचरा साचल्याने नदीचा प्रवाह ठप्प; शेकडो एकर पिके जलमय

Web Title: Wardha news domestic gas cylinder commercial use 67 seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder
  • wardha
  • Wardha Crime
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
1

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
2

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
3

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.