वर्धा जिल्ह्यात हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागाने ४३ ठिकाणी कारवाई करत ६७ सिलिंडर जप्त केले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील एका कॉम्प्युटर ऑपरेटरला इंस्टाग्रामवरील नोटिफिकेशनद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून शेअर बाजार आणि IPO मध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर सायबर भामट्यांनी त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 12…
वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित ₹4.50 कोटींच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ठेवीदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वर्ध्यात घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय मंजू संदीप पचारे हिची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. जुनी कामठी परिसरात ही घटना घडली. मंजूने पतीविरोधात घटस्फोट घेतला होता.…
वर्ध्यातील हिंगणघाट येथे विवाहित महिलेचा पती आणि सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी पतीने पत्नीचे खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ नातेवाईक व मित्रांना…
वर्ध्यात 50 रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या झाली. आरोपीने लाकडी राफ्टरने डोक्यावर वार करत जीव घेतला. न्यायालयाने दोषी ठरवत आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
वर्धा जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीचे पाच वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला पुलगाव पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
आर्वीच्या भाजी मंडई परिसरात मानसिक रुग्णाने नग्नावस्थेत दंडुक्याने बेछूट हल्ला करत वृद्धासह दोन जणांची हत्या केली. पोलिस व नागरिकांनी मिळून आरोपीला पकडले. घटनेने परिसरात दहशत पसरली.
मयूर यालाही नोकरीसाठी पैसे द्यावे लागेल, असे सांगण्यात आले. ओळख मंत्रालयातील असल्याने दोघांनाही विश्वास बसला आणि त्यांनी त्यांनी पैशांची जुळवाजुळव करत पैसे एकत्रित केले.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.