Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : अवैध खनिज उत्खननावर मोठी कारवाई; ५२ प्रकरणे उघड, १७.९९ कोटींचा दंड, ४९ वाहने जप्त

Wardha News : वर्धा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक मोहीम राबवली. पाच महिन्यांत ५२ प्रकरणे उघडकीस आली असून तब्बल १७.९९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 28, 2026 | 04:54 PM
Illegal Mining representative Image

Illegal Mining representative Image

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात अवैध गौण खनिज उत्खननाची ५२ प्रकरणे उघडकीस
  • १७.९९ कोटींचा दंड; आतापर्यंत ६७.९१ लाख रुपये वसूल
  • ४९ वाहने जप्त; ३१ गुन्हे दाखल, २० आरोपींना अटक
 

Wardha News : वर्धा जिल्ह्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतुकीला चाप लावण्यासाठी महसूल प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाच्या कारवाईत अवैध उत्खनन आणि वाहतुकीची तब्बल ५२ प्रकरणे समोर आली आहेत.

या प्रकरणांमध्ये संबंधितांवर तब्बल १७ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, ठोठावलेल्या दंडाच्या तुलनेत प्रत्यक्ष वसुलीची रक्कम कमी असून आतापर्यंत ६७ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेतीच्या अवैध उत्खननाची सर्वाधिक प्रकरणे

प्रशासनाच्या कारवाईत सर्वाधिक प्रकरणे रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. एकूण ५२ प्रकरणांपैकी तब्बल ४० प्रकरणे रेतीची आहेत. त्यानंतर मुरुमच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीची ११ प्रकरणे आढळली आहेत. तर दगडाच्या अवैध उत्खननाचं एक प्रकरण नोंदवण्यात आलं आहे.

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या कारवाईत अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणारी तब्बल ४९ वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात विनापरवाना खनिज वाहतूक करणाऱ्यांचं चांगलंच धाबं दणाणलं आहे.

३१ गुन्हे दाखल, २० जणांना अटक

अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता कायदेशीर कारवाईही केली आहे. एकूण ३१ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, विविध प्रकारच्या गौण खनिजांसाठी ठोठावलेल्या दंडातही मोठी तफावत आहे. रेतीसाठी ६२ लाख १० हजार ९१० रुपये, मुरुमसाठी १७ कोटी ३६ लाख २३ हजार ३६७ रुपये, तर दगडासाठी ७० हजार ४०० रुपये दंड निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाची तपासणी आणि कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Web Title: Wardha news illegal mining transport action 52 cases 17 99 crore fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
1

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
2

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
3

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.