Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

देवळी तालुक्यात सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचे पंचनामे रखडल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला हार व नारळ अर्पण करून निषेध नोंदवला.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 02:20 PM
Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

Follow Us
Follow Us:
  • ३०० तक्रारींपैकी फक्त ७० पंचनामे पूर्ण
  • कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने शेतकरी संतप्त
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी
 

देवळी : सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी पाहायला मिळाला. पंचनामे करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी देवळी तालुका कृषी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा रोष आणखी वाढला. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार आणि नारळ अर्पण करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

चालू खरीप हंगामात काही शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी

मात्र, तक्रारी दाखल करूनही पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Wardha News : १० वसतिगृहात ३२७ जागा रिक्त, शासकीय वसतिगृहात ९२५ जागा; ५९८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

३०० तक्रारींपैकी केवळ ७० पंचनामे

कृषी विभागाकडे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या सुमारे ३०० तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यापैकी आतापर्यंत केवळ ७० शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल २७० तक्रारींच्या अनुषंगाने पंचनामे अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसु आणि खरेदी-विक्री संघाचे सभापती अमोल कसणारे यांनी केले. अरुण लाहोरे, सुनील बासू, रवींद्र चौधरी, पवन महाजन, सुरेश वैद्य, हरीश ओझा यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Wardha News : भोसा बंधाऱ्याने बुडवला खरीप हंगाम, कचरा साचल्याने नदीचा प्रवाह ठप्प; शेकडो एकर पिके जलमय

Web Title: Wardha news soybean panchnama delay farmers protest deoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Farmers News
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
1

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
2

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध
3

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
4

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.