Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीतील मंदिरांच्या जमिनींसाठी आंदोलनाचा इशारा; मंदिर सरकारीकरणाला विरोध

चिपळूण येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या अधिवेशनात सुनील घनवट यांनी रत्नागिरीतील मंदिरांच्या जमिनी शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यांनी मंदिर सरकारीकरणाविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2025 | 07:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या असून, या जमिनी तत्काळ देवस्थानच्या नावे करण्यात याव्यात, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आला. चिपळूण येथे पार पडलेल्या जिल्हा अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी हा इशारा दिला.

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली,भारताच्या राष्ट्रपतींच्या समोर दसपटीच्या सुपुत्राने दिला कोकणाचा परिचय

चिपळूण येथील स्वामी मंगल कार्यालयात २४ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु सत्यवान कदम, स्वामी स्वरुपानंद सेवामंडळ पावसचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे, निवृत्त सह धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, अधिवक्ता जनार्दन करपे आणि सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. जिल्हाभरातील ४५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त व प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते.

या वेळी सुनील घनवट यांनी मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन केले. “मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. सरकार मंदिरांच्या मालमत्तेवर ताबा मिळवत आहे, याला विरोध करण्यासाठी आम्हाला रत्नागिरी पॅटर्न उभा करायचा आहे,” असे ते म्हणाले. सद्‌गुरु सत्यवान कदम यांनी मंदिर संस्कृतीच्या जतनाविषयी भाष्य केले. “मंदिरांमुळे हिंदू संस्कृती टिकून आहे. मात्र, तीर्थक्षेत्रे आता केवळ पर्यटनस्थळे बनली आहेत. मंदिरांतून धर्मशिक्षण दिले गेले तर श्रद्धा वाढेल आणि देशासाठी समर्पित पिढी घडेल,” असे त्यांनी सांगितले.

निवृत्त धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना मंदिर व्यवस्थापन आणि न्यास नोंदणी प्रक्रियेबाबत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. अधिवक्ता जनार्दन करपे यांनी मंदिरांना येणाऱ्या कार्यालयीन अडचणींबाबत मार्गदर्शन केले. जयंत देसाई यांनी मंदिर रक्षणासाठी राजाश्रय मिळवण्याची गरज व्यक्त केली. “मंदिरांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांना बळकट करणे आवश्यक आहे. श्रद्धाळूंनी सेवा भावनेने मंदिर व्यवस्थापनात सहभाग घ्यावा,” असे ते म्हणाले.

शिखर शिंगणापुरात ‘हर हर महादेव’चा जयघोष; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

या वेळी संजय जोशी यांनी मंदिर संरक्षणासाठी जुगार व इतर अपप्रवृत्ती बंद करण्याचे आवाहन केले. “सामूहिक आरती, गदा पूजन, गुढीपूजन यासारखे उपक्रम राबवून मंदिर संस्कृती जोपासूया,” असे ते म्हणाले. यावेळी दिलीप देशमुख, निवृत्त धर्मदाय आयुक्त, महेश पोंक्षे , महाराष्ट्र मंदिर महासंघ, चिपळूण तालुका संयोजक, रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली आणि मंडणगड, लक्ष्मण गुरव, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली तालुका संयोजक, उमेश गुरव, सकल गुरव समाज संघटना, सुभाष गुढेकर, कृष्णा पंडित, गणेश उतेकर, प्रदीप चव्हाण, दीपक कदम- महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.

Web Title: Warning of agitation for temple lands in ratnagiri opposition to temple governmentization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा
1

Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून
2

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून

Ratnagiri News : स्मार्टवीजमीटर प्रकरणी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक; ग्राहकांची संमत्ती नसतानाही मीटर बसवल्याचा आरो
3

Ratnagiri News : स्मार्टवीजमीटर प्रकरणी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक; ग्राहकांची संमत्ती नसतानाही मीटर बसवल्याचा आरो

Ratnagiri News :  शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे
4

Ratnagiri News : शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.