कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) ही भारतीय संघाची एक औपचारिक नागरी सेवा आहे. ही सेवा संघाच्या मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. या सेवेचे समर्थ अविनाशराव शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर राष्ट्रपती भवनमध्ये कोकणाचा परिचय करून देताना उत्तम सादरीकरणाने कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे.
भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यशस्वी होत शिमला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भावी सनदी अधिकाऱ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष निमंत्रणास अनुसरुन राष्ट्रपती भवनास भेट देऊन प्रशिक्षणाबाबत सादरीकरण करण्याची नुकतीच संधी समर्थ शिंदे यांना प्राप्त झाली.
कोकणातील दसपटी,चिपळूण येथील २०२४ च्या बॅचमधून भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) कॅडर असलेल्या समर्थ अविनाशराव शिंदे यांना कोकण विभागाच्या परिचय सादरीकरण करण्याची संधी मिळाली. आपल्या प्रशिक्षणाबाबत प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने माहिती देत समर्थने राष्ट्रपती भवनात कोकणचा, दसपटीचा आवाज पोचवला. चाणक्य मंडळच्या मुशीत घडलेल्या समर्थ शिंदे यांच्यावर अविनाश धर्माधिकारी यांचे संस्कार असून संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास ही कौशल्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच आत्मसात केली आहेत.
समर्थच्या या कामगिरीने देशातील अव्वल कॅडरमध्ये कोकणातील कर्तृत्वाचा ठसा उमटत असून भविष्यात येथील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरेल. याबद्दल समर्थ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) ही भारतातील सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था आहे. ही एक गट ‘अ’ केंद्रीय नागरी सेवा आहे. या संस्थेचे अधिकारी केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांचे ऑडिट करतात.
केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांचे ऑडिट करणे
सार्वजनिक व्यावसायिक उपक्रम आणि गैर-व्यावसायिक स्वायत्त संस्थांच्या खात्यांचे ऑडिट करणे
सरकारी वित्तपुरवठ्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे
सुशासनाच्या यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे
संस्थेचे मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन तयार करणे
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांच्या आदेशांचा वापर करणे
IA&AS मध्ये सामील होण्यासाठी:
UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) द्यावी लागते
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसुरी येथे अभ्यासक्रम करावा लागतो