Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: फटका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; सुनावणीकडे लक्ष… ५०% मर्यादा ओलांडल्याने चिंता वाढली

ओबीसींच्या २७% आरक्षणामुळे ५०% मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा चिघळत असून वाशिमसह अनेक जिल्ह्यांत प्रभाग बदलाची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 25, 2025 | 07:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रभाग बदल आणि लॉटरीची शक्यता
  • राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण
  • जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ मोडमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळला असून ओबीसींसाठी लागू केलेल्या २७ टक्के आरक्षणामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेचा भंग झाल्याचे चित्र समोर आले आहे. वाशिम जिल्हाही याला अपवाद ठरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रभाग रचना, आरक्षणाचे टक्केवारी आणि निवडणुकीची पुढील प्रक्रिया यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील याचिकेची सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी (दि. २५) सुनावणी होणार असून, न्यायालयीन निकालानंतरच पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. (Washim: Local body elections hit)

Pune Weather News: पुण्यातून थंडी गायब! शहरातील तापमानात चढउतार; कोकणात पावसाचा अंदाज

सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाची कमाल मर्यादा ५०% पेक्षा जास्त नसावी, असा स्पष्ट आदेश दिला होता. तरीही नव्या आरक्षण गणनेनुसार काही जिल्ह्यांत ५०% पेक्षा जास्त आरक्षण लागू झाले असून वाशिममध्येही काही प्रभागांत आरक्षणाची मर्यादा वाढल्याचे उघड झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिस्थिती गांभीर्याने घेतली असून “न्यायालयीन निर्णय येईपर्यंत कोणत्याही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ मोडमध्ये गेले आहे. आधीच विविध पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. काही इच्छुकांनी गावोगावी फिरून संपर्क मोहिमा सुरूही केल्या होत्या. पण आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत असल्याने उमेदवारांसमोर नवीन रणनीती ठरवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

राज्याच्या आरक्षण गणनेत सुधारणा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास वाशिमसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत आरक्षित प्रभागांची संख्या कमी-जास्त करण्याची गरज निर्माण होऊ शकते. यामुळे प्रभाग नकाशे पुन्हा आखण्याची वेळही येऊ शकते. अशा वेळी लॉटरी प्रणाली लागू होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच अनेक जणांनी ज्याप्रमाणे तयारी केली आहे, तो प्रभाग कदाचित त्यांच्यासाठी खुला राहणारच नाही. याचा थेट परिणाम राजकीय गणितावर होणार असून प्रभागांचे आरक्षण एकाच झटक्यात बदलल्यास अनेक इच्छुकांची समीकरणं पूर्णपणे बिघडू शकतात. जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची मानणाऱ्या नेत्यांसाठी ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची ठरत आहे.

Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर

गेल्या काही आठवड्यांपासून वाशिममध्ये निवडणूक तयारीला वेग आला होता. अनेक पक्षांनी घराघरात भेटी, प्रभागवार बैठक, संघटन बांधणी सुरू केली होती. काही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराचे प्रारंभिक नियोजनदेखील केले होते. मात्र आता संपूर्ण जिल्ह्यात “निवडणूक होणार तरी कधी?” हा प्रश्न मोठा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच प्रभागातील आरक्षण, बदल, लॉटरी आणि पुढील तारखा निश्चित होणार असल्याने सर्वांच्या नजरा आजच्या सुनावणीकडे खिळल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आणि वाशिमच्या प्रभागांचे भविष्य दोन्हीही आजच्या निकालावर अवलंबून आहे.

Web Title: Washim local body elections hit attention to hearing concerns increased as 50 limit crossed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Buldhana
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

Supreme Court on Election Reservation: ५०टक्के आरक्षण मर्यादा वाद : स्थानिक स्वराज्य निवडणूक थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत
1

Supreme Court on Election Reservation: ५०टक्के आरक्षण मर्यादा वाद : स्थानिक स्वराज्य निवडणूक थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत

वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! ‘विकास’ ठरणार निवडणुकीचा मुख्य मुद्दा; मतदारांना नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा
2

वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! ‘विकास’ ठरणार निवडणुकीचा मुख्य मुद्दा; मतदारांना नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा

Pandharpur Election: दारू-मटणाच्या राजकारणात हरवत चाललेले पंढरपूरचे भवितव्य
3

Pandharpur Election: दारू-मटणाच्या राजकारणात हरवत चाललेले पंढरपूरचे भवितव्य

Local Body Election 2025 : लियाकत शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद! चिपळूणच्या राजकारणात घडतंय तरी काय?
4

Local Body Election 2025 : लियाकत शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद! चिपळूणच्या राजकारणात घडतंय तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.