पुण्यात थंडीचा कडाका कमी (फोटो- istockphoto)
पुण्यातील हवामानात चढउतार
शहरात कमी झाला थंडीचा कडाका
पुण्यात सकाळ-संध्याकाळ गारवा कायम
पुणे: राज्यातील हवामानातील बदलाचा परिणाम पुणे (Pune) शहरातही जाणवत असून अलीकडे जाणवणारी थंडी आता कमी होताना दिसत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग घटल्याने शहरात तापमानात (Weather) वाढ झाली असून दिवसागणिक हवेत उब जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत सकाळ-संध्याकाळ गारवा कायम असला तरी दिवसाच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढली आहे.
मंगळवारी पुण्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. बुधवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण कायम असून कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हवामान स्थितीचा परिणाम पुणे आणि आसपासच्या भागावर जाणवतो आहे. दिवस ढगाळ आणि दमट तर रात्री किंचित गारवा अशी स्थिती कायम आहे.
पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकण-गोवा विभागात काही ठिकाणी पाऊस पडला असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहिले. उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाडा आणि दक्षिण कोकण-गोव्यात तापमान सामान्यापेक्षा किंचित जास्त नोंदवले गेले.
गेल्या काही दिवसांची स्थिती काय?
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर बुधवारपासून पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला
पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट
पुण्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा बदल आता अधिक ठळकपणे दिसू लागला आहे. शहरातील तापमानात पुन्हा एकदा घट नोंदवली गेली असून थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून स्थिर असलेल्या तापमानात आणखी घट झाली आहे. तापमान १२.६ अंश सेल्सिअस वर गेले असून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील चार दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.






