Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! ‘विकास’ ठरणार निवडणुकीचा मुख्य मुद्दा; मतदारांना नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा

Washim Municipality Election: प्रचारासाठीचा कालावधी मर्यादित असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून 'विकासाच्या मुद्द्याला' हात घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 24, 2025 | 05:18 PM
वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! (Photo Credit - X)

वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • विकासाच्या मुद्यांवरच रंगतोय निवडणुकीचा फड
  • थंडीत तापले राजकारण
  • मतदारांना नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा
वाशिम, शहर प्रतिनिधी: वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा या चार नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर आता वाढू लागला आहे. प्रचारासाठीचा कालावधी मर्यादित असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून ‘विकासाच्या मुद्द्याला’ हात घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, मतदारांना देखील यंदा नव्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या चेहऱ्यांकडून विकासकामांची मोठी अपेक्षा असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

अनेक वर्षांपासून विकास खुंटला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य आणि राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य देत, भाजप युती असो वा काँग्रेस आघाडी, सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह चारही नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायत क्षेत्रात गत अनेक वर्षांपासून विकास खुंटला आहे.

निधीचा चुराडा: शहरी भागाच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला, परंतु तत्कालीन पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या निधीतून अपेक्षित विकास झाला नसल्याची ओरड नागरिक करत आहेत.

अपूर्ण प्रकल्प: शहरातील टेंम्पल गार्डन, तारांगण, नाट्यगृह हे प्रकल्प कोट्यवधींचा निधी खर्चून उभारले गेले, पण ते धुळखात पडून असल्याने या निधीचा चुराडा झाल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा: वैजापूर पालिका निवडणुकीत ‘नातेसंबंधांची लढाई’! काका-पुतण्या, आत्या-भाची, बाप-बेटे रिंगणात; प्रचारासाठी फक्त ८ दिवस!

मूलभूत सुविधांची समस्या कायम

शहरातील नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल करणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वपक्षीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या सुविधा मिळू शकलेल्या नाहीत. आजही अनेक महत्त्वाच्या समस्या कायम आहेत:

पाणीपुरवठा: पिण्यायोग्य पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा होत नाही.

रस्ते: शहरात दर्जेदार अंतर्गत आणि प्रमुख रस्ते निर्माण झालेले नाहीत.

कचरा व्यवस्थापन: दैनंदिन कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही.

वाहतूक कोंडी: लाखो रुपये खर्चून उभारलेली सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झालेली नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडण्याचा निर्धार

या निवडणुकीत नशीब आजमावत असलेले उमेदवार या समस्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही देत आहेत, तसेच शहराचा कायापालट करण्याची आश्वासने मतदारांना दिली जात आहेत.

मतदारांची अपेक्षा: नागरिकांकडून सर्व प्रकारचा कर भरूनही सुविधा न मिळाल्याने, यंदा स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच पालिकेच्या सत्तेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे.

व्हिजनची चाचपणी: मतदार देखील शहर विकासाचे ‘व्हिजन’ (Vision) कोणत्या पक्षाकडे आहे, याची चाचपणी करीत असल्याचे चित्र आहे.

एकूणच, यंदा वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर येथील निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्यावरच रंगणार असल्याचा कयास राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

हे देखील वाचा: Local Body Election: चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली? ‘उबाठा’त दुफळी; निवडणुकीत काय होणार?

Web Title: Washim district municipality election fever increases development will be the main issue of the election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • Washim news

संबंधित बातम्या

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार
1

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
2

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Eknath Shinde :  “पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
3

Eknath Shinde : “पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Maharashtra Local Body Election : काँग्रेस-वंचितचा राजकीय घटस्फोट; निवडणूकीच्या ऐनवेळी खुपसला खंजीर
4

Maharashtra Local Body Election : काँग्रेस-वंचितचा राजकीय घटस्फोट; निवडणूकीच्या ऐनवेळी खुपसला खंजीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.