वैजापूर पालिका निवडणुकीत 'नातेसंबंधांची लढाई'! (Photo Credit - X)
वैजापूर पालिका निवडणुकीत ‘नातेसंबंधांची लढाई’!
पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉर्नर (कोपरा) सभा, बैठका सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशींसह शिवसेनेचे संजय बोरनारे व कॉग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड़ निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहरातील काही प्रभागांमधील नातलगांच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक। १ व मध्ये मसिरा शेख सुमैय्या शेख या अनुक्रमे भाजप-शिवसेनेच्या आत्या-भाचीमध्ये लढत होत आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या झडताहेत फैरी !
विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी डॉ. दिनेश परदेशी व संजय बोरनारे या दोहोंतील सामना चुरशीचा होणार असून यानिमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून जोरदार ‘चिखलफेक’ सुरू आहे. ‘आम्ही शहरवासीयांसाठी काय केले?’ हे पटवून सांगण्यासाठी दोघांत स्पर्धा रंगली आहे. दोघेही इरेला पेटले असून एकमेकांविरुद्ध ‘राळ” उठविली जात आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण ऐन थंडीत चांगलेच ‘तापले’ आहे.
शहराच्या कट्ट्यांवर रंगताहेत राजकीय चर्चा जोरात
प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवे रियाज शेख व शिवसेनेचे मिरान शेख या काका-पुतण्याच्या लढतीकडे अख्ख्या शहराचे लक्ष वैधले आहे. ही लढत तुल्यबळ मानली जात आहे. हा प्रभाग म्हणजे दोघांचेही ‘होमपीच’ आहे. त्यामळे कुणाची सरशी होणार? याचाबत चर्चा झाडू लागल्या आहेत. यात काका म्हणजेच रियाज शेख हे माजी नगरसेवक असून ते राजकारणात चांगलेच मुरलेले आहे तर दुसरीकडे पुतण्या मिरान शेख नवखा असला तरी तो चांगली लढत देऊ शकतो. अशीही चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेचे हमीद कुरेशी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अकिल कुरेशी या मावसभावांचा सामना होत आहे. ही लढतही रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून डॉ. विजया डोंगरे व ज्योती डोंगरे या सख्ख्या जावा आमनेसामने नसत्या तरी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक आखाड्यात पदर खोचून उत्तरल्या आहेत. शिवसेनेचे सावेरखान व ताहेरखान हे बाप-बेटे, भाजपकडून प्रकाश चव्हाण चित्रा चव्हाण हे पत्ती-पत्नी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.
प्रभाग क्रमांक ११ आ मधून भाजपचे दशरथ बनकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पुंडलिक गायकवाड या ‘सोव-याची’ मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस । अजित पवार) युती असली तरी येथे दोन्ही पक्षानी स्वतंत्र उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे, प्रभाग क्रमांक ७ व मध्ये शिवसेनेच्या ललिता सालुके व भाजपच्या सविता चहाण या नातलग उमेदवार पदर खोचून आमनेसामने उभे ठाकल्या आहेत.






