Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar चा ३० वर्षांचा पाणी संघर्ष संपला; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन योजना कार्यान्वित!

अनेक वर्षांपासून वापरात असलेली ७०० मिमीची जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन बदलून आता ९०० मिमीची नवीन मोठी पाईपलाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 19, 2026 | 09:48 AM
Chhatrapati Sambhajinagar Water Scheme, Jayakwadi Dam Water Supply,

Chhatrapati Sambhajinagar Water Scheme, Jayakwadi Dam Water Supply,

Follow Us
Close
Follow Us:
  • गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न सुटणार
  • जायकवाडीतून ‘सायफन’ तंत्रज्ञानाने पाणी उपसा सुरू
  • ९०० मिमीची नवीन जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सज्ज
Chhatrapati Sambhajinagar  Water Crisis : शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा ऐतिहासिक टप्पा आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्ण होत आहे. जॅकवेलमध्ये ‘सायफन’ तंत्रज्ञानाने पाणी घेण्यास सुरुवात होणार असून, ९०० मिमीची नवीन जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे संभाजीनगरकरांना आता हक्काचे आणि पुरेसे पाणी मिळणार आहे.

गेल्या ३० वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न अत्यंत जटील बनला होता. या गंभीर समस्येची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश स्वतः रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी तब्बल ५ तास प्रकल्पाची पाहणी केली होती. उच्च न्यायालयाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर ही बहुचर्चित योजना प्रत्यक्ष पूर्णत्वास आली आहे. गुढीपाडव्याच्या या गोड बातमीमुळे शहरात आनंदाचे वातावरण असून, प्रशासनाकडून योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Ahilyanagar News: गॅसअभावी सरपणाच्या मागणीत वाढ! बेकरी व्यावसायिक अडचणीत

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेली ७०० मिमीची जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन बदलून आता ९०० मिमीची नवीन मोठी पाईपलाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे शहराच्या पाणी वितरण प्रणालीत मोठी सुधारणा होऊन पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.

या योजनेअंतर्गत जायकवाडी धरणातून १०० मिमी पाईपलाईनद्वारे आणि ४२२ हॉर्सपॉवरच्या शक्तिशाली पंपांच्या साहाय्याने पाणी उपसले जाणार आहे. हे पाणी थेट ‘फारोला जलशुद्धीकरण प्रकल्पात’ नेऊन त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर शहराच्या विविध भागांना पुरवले जाईल. या नवीन नियोजनामुळे तांत्रिक बिघाड कमी होऊन शहरवासीयांना अधिक स्थिर आणि पद्धतशीर पाणीपुरवठा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; 

९०० मिमी पाईपलाईनमुळे टंचाईतून मोठा दिलासा!

सध्या विविध योजनांच्या माध्यमातून शहराला साधारण १५० ते १६० एमएलडी पाणी मिळते. मात्र, ९०० मिमीची नवीन पाईपलाईन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर एकट्या या वाहिनीतून ७२ एमएलडी पाणी मिळण्याची दाट शक्यता आहे.

या नवीन प्रणालीमुळे शहराचा एकूण पाणीपुरवठा १७० ते १७२ एमएलडीपर्यंत पोहोचणार असून, यामुळे अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. दरम्यान, पाणीपुरवठ्यात होणारी गळती रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्य पाईपलाईनवरून नियमबाह्य पद्धतीने पाणी घेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनधिकृत जोडण्यांवर आता कडक कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यामुळे शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे.

 

Web Title: Water crisis solved siphon technology and 900mm pipeline to end sambhajinagars 30 year struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam

संबंधित बातम्या

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात
1

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन
2

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान
3

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक
4

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.