Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्ह्यातील आठ प्रकल्पातून होतोय पाण्याचा विसर्ग, १० प्रकल्पांमध्ये सरासरी ७८.२८ टक्के जलसाठा

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जुलै महिन्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे, यवतमाळ जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प (Irrigation projects) ओसंडून वाहत आहे. २५ जुलै पर्यंत ६०६.७ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो (overflow ) झाले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 26, 2022 | 11:18 AM
जिल्ह्यातील आठ प्रकल्पातून होतोय पाण्याचा विसर्ग, १० प्रकल्पांमध्ये सरासरी ७८.२८ टक्के जलसाठा
Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : पाटबंधारे विभाग (Irrigation Department) यवतमाळ अंतर्गत येत असलेल्या एकूण १० प्रकल्पांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊसमान झाले आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओसंडून वाहत असून आठ प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग (Water discharge) केला जात आहे. तर, या १० प्रकल्पांमध्ये सरासरी ७८.२९ टक्के जलसाठा असल्याने ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तर, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जुलै महिन्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामूळे यवतमाळ जिल्ह्यातील लघू मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्प (Irrigation projects) ओसंडून वाहत आहे. २५ जुलै पर्यंत रोजी ६०६.७ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो (overflow ) झाले आहे. तर, यवतमाळ (Yavatmal) पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या १० प्रकल्पामध्ये सरासरी ७८.२९ टक्के जलसाठा नोंद करण्यात आला आहे. यापैकी पाच प्रकल्पामध्ये १०० जलसाठा आहे. तर आठ प्रकल्पांमध्ये जलपातळी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

यामध्ये पुस प्रकल्पात ५८.८६ टक्के जलसाठा व जलपातळी ३९४.१० मिमी पर्यंत वाढली आहे़ यासोबतच दिग्रस तालुक्यातील अरूणावती प्रकल्पात ४७.९० टक्के जलसाठी असून जलपातळी ३७२.८४ मीटरपर्यंत वाढली आहे. बेंबळा प्रकल्पात ४६.५२ टक्के जलसाठा तर जलपातळी २६६.१५ मिमी पर्यंत वाढल्याने चार दरवाजे २५ सेंमी उघडले असून १०० घसेंमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोकी प्रकल्प १०० टक्के भरले असून ३१.१६५ घन सेमीने विसर्ग सूरू आहे. वाघाडी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून २८.३५ घन सेमीने विसर्ग होत आहे. सायखेडा १०० टक्के भरले, ६९.३७६ घसेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अधरपुस प्रकल्पात ६४.३८ टक्के जलसाठा आहे. दोन गेट १२.५ सेमीने उघडण्यात आले असून २५ घनसेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. बोरगाव येथे १०० टक्के असून २ सेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अडाण प्रकल्पात ६५.२३ टक्के जलसाठा असून ३ गेट १० सेमी तर २ गेट ५ सेंमीने उघडण्यात आले आहे. नवरगांव प्रकल्प १०० टक्के भरला असून ४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.

यवतमाळ शहराला पाणी पूरवठा करणारे निळोणा व चापडोह धरण ओसंडून वाहत आहे. तसेच महागाव पाटंबधारे उपविभागाअंतर्गत येत असलेले दराटी, पिंरंजी, तरोडा प्रकल्प १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहे. यवतमाळ-नांदेड या दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ८०.०६ टक्के भरले आहे. इसापुर धरणावरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरेखड महागाव तालुक्यात काही गावांना पाणी पूरवठा केल्या जातो. सध्या स्थितीत इसापुर धरणाची देखिल जलपातळी वाढली आहे. येत्या काळातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटल्याने समाधान कारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

Web Title: Water is being discharged from eight projects in the district average water storage in 10 projects is 78 28 percent nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 11:17 AM

Topics:  

  • irrigation projects

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात…” ; CM फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
1

Devendra Fadnavis: “सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात…” ; CM फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

Maharashtra News: “महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी…”; राधाकृष्ण विखे-पाटलांचे नेमके वक्तव्य काय?
2

Maharashtra News: “महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी…”; राधाकृष्ण विखे-पाटलांचे नेमके वक्तव्य काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.