फोटो सौजन्य: iStock
ठाणे शहर हे दिवसेंदिवस झपाट्याने प्रगत होत आहे आणि येथे राहणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर तुम्हीही ठाणेकर असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या बुधवारी, दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी, ठाणे शहरातील काही निवडक भागांमध्ये पाणीपुरवठा तब्बल 12 तासांसाठी खंडित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक ती पाणीसाठा व्यवस्था करून घ्यावी, जेणेकरून या काळात अडचणी टळतील. महापालिकेने देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग आरटीओची खाजगी बसेस वर कारवाई; मात्र ही तर फक्त धूळफेक ! मनसे उपजिल्हाध्यक्षांचा आरोप
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर. येथे मुख्यजलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी बुधवार दिनांक 09/04/2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 12 तासाचा शटडाऊन घेवून तातडीची कामे हाती घेणार आहे.चला जाणून घेऊया कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Maharashtra Politics : सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज उर्फ बंटी पाटील यांचा सवाल
परिणामी बुधवार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवाचा काही भाग इत्यादी भागात 12 तासांसाठी पुर्णपणे पाणी पुरवठा बंद राहील.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.