मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती ही प्रगल्भ असली पाहिजे. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने निवडणूक लढवायचे ठरवले आहे. पण जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्हीही तेवढ्याच मजबुतीने रिंगणात उतरलो आहोत, पण प्रश्न सहाव्या जागेचा आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केले आहे. सहाव्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे मत नाहीत म्हणून आता आमदारांवर दबाव आणला जाणार आहे, त्यांना पैसा दिला जाणार, जुन्या प्रकरणात ईडी आणि केंद्राला घुसवणार असे काम करून आमदारांवर दबाव आणला जाणार आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी फायदा होणार नाही म्हणून उगाच भाजपने पैसे वाया घालवू नये, त्यापेक्षा सामाजिक कार्यात पैसे खर्च करावेत, लोकांना अशी चटक लावू नये, असा टोलाही मारला आहे.
आम्हाला अशा निवडणुकांचा सर्वाधिक अनुभव आहे, कोण कोणासोबत आहे हे १० तारखेला कळेलच. फक्त भाजपने उगाच पैसे खर्च करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.