मीरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यातून महिनाभरापासून मंजुर कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय दोन दिवसाआड जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानिमित्त हा पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून ८६ दक्षलक्ष लिटर तर एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असा एकूण २२१ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजुर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे यातील जवळपास 200 दक्षलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो.
परंतु गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला केवळ सरासरी १९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यात दोन ते तीन दिवसाआड जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतो. परिणामी शहरातील जुन्या भागात तसेच दाट लोकवस्ती असलेल्या गृह संकुलात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. यामुळे नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहत आहेत. तर बऱ्याच वेळा टँकर चालकांकडे देखील पाणी नसल्याने कोरडाच दिवस काढावा याबाबत आपल्या मिराभाईंदर शहरातील प्रतिनिधी विजय काते यांनी आपला दैनिक वृत्तपत्रांमध्ये याबाबत बातमी ही लावली होती. त्याच अनुषंगाने शहरात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईबाबत पालिकेत काही दिवसापूर्वी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. तसेच आज मनसेमार्फत हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासंपूर्ण विषयाबाबत मिरा-भाईंदज शहरातील राजकीय पुढार्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ.
तसेच या बाबतीमध्ये मीरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांना विचारणा केली असता त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. सर्व राजकीय पक्षाकडून मीरा-भाईंद शहरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल आक्रमक भूमिका आहे पाणीपुरवठ्यावरती मीरा-भाईंदर महानगरपालिकेने लवकरच तोडगा काढावा त्याने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांचे हाल होणार नाही.
मीरा भाईंदरमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीमध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या घरांमध्ये वाढ होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी कपात होत असल्यामुळे टँकरची मदत घ्यावी लागत आहे. त्याचबरोबर टँकर चालकाकडे पाणी नसल्यामुळे संपूर्ण दिवस कोरडा काढावा लागत आहे.