नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असतानाच नाशिक सुरगाणा येथील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर आले की, शिवसेनेतील प्रवेश सोहळा ठरलेला हे जणू समिकरणच झाले आहे.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे गटातून शिवसेनेत (शिंदे गट) करण्याची ही जवळपास चौथी ते पाचवी घटना आहे. शिवसेनेकडून हे प्रवेश सोहळे जणू संजय राऊतांना डिवचण्यासाठीच घडवून आणले विषय बनला आहे. राऊत यांच्या वाचाळ वृतीस कंटाळून उद्धव ठाकरे गट सोडण्याचा घेतला निर्णय घेतला असल्याचे सुरगाणा येथील ठाकरे गटाच्य नगरसेवकांनी म्हटले आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश सोहळाने ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोर का ‘झटका’ देऊ केला आहे.
सुरगाणा नगरपंचायत उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, गटनेत्यासह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश झाला. त्यात नगराध्यक्ष भारत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेवक भगवान आहेर, पुष्पा वाघमारे, अरुणा वाघमारे, प्रमिला वाघमारे, कार्यकर्ते दिनेश वाघ, विलास गोसावी, चारोस्कर, गौरव सोनवणे यांनी प्रवेश केल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी सांगितले.
नाशिकमधून सर्वाधिक प्रवेश
नाशिक शहर व जिल्ह्यातून आजवर सर्वाधिक प्रवेश सोहळे हे शिवसेनेत झाले आहे. यामुळे एकूणच राजकीयदृष्ट्या नाशिककडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्याच अनुषंगाने शिवसेनेकडून इतर पक्षातील पदाधिकारी व आजी माजी नगरसेवकांना प्रवेश दिले जात असल्याने ही सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचीच तयारी सुरू असल्याचे दिसून येते.