Who is behind the Umesh Kolhe massacre? Search operation by NIA and raids in 13 places
अमरावती : उमेश कोल्हे हत्याकांडात (Umesh Kolhe massacre) पोलीस व एनआयएच्या (Police and NIA) चमूने गुरुवारी नऊ जणांची चौकशी केली. या हत्याकांडात आर्थिक फंड पुरविणारे कोण आहेत ? (Who are the financial fund providers? ) याबाबत एनआयए चौकशी करीत आहे. एनआयएच्या पथकाने संशयीतांकडून डीव्हीआर, मोबाईल फोन, चाकू, सिम कार्ड, मेमरी कार्ड, दहशतवादी संघटनेशी जुळलेले काही पॉपेलट व पुस्तके जप्त केले आहेत. यासाठी एनआयएचा एक चमू अमरावती तळ ठोकूनच आहे.
१३ ठिकाणी छापेमारी
एनआयए व पोलीस यांनी संयुक्तरित्या बुधवारी शहरातील १३ ठिकाणी छापेमारी (Raids at 13 places) करण्यात आली असून, यामध्ये नागपूरी गेट व कोतवाली पोलिसांचे (Nagpuri Gate and Kotwali Police) सहकार्य लाभले. या हत्येमागे आर्थिक फंड पुरविणारे कोण आहेत, याबाबत एनआयए छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुंबईच्या एनआयए कोर्टात आरोपीची पेशी
एनआयएच्या चमूने अमरावती शहरातून अटक केलेल्या सात आरोपींना गुरुवारी मुंबईच्या एनआयए कोर्टात हजर केले होते. त्या अनुषंगाने एनआयए सर्व आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.
धमकावणाऱ्याचीही चौकशी
एनआयए नऊ जणांची चौकशी करीत आहे. त्यामध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल फोनवर धमकी देणाऱ्या एक दोघा जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांना नागपुरी गेट पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.