eknath shinde
मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, (Ekanth Shinde will be new CM of Maharashtra) अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, (Ekanth Shinde will be oath CM of Maharashtra) अशी माहिती फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे. दरम्यान, फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसचे त्यांचा मास्टरस्ट्रोक (Master stroke) सुद्धा मानला जात आहे.
[read_also content=”मणिपूरमध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलामुळे लष्कराचे 30 ते 40 जवान मातीत गाडले गेले, 7 मृतदेह बाहेर काढले https://www.navarashtra.com/india/the-landslide-buried-30-to-40-army-personnel-in-the-ground-299091.html”]
राजकीय प्रवास
दरम्यान, साताऱ्याला (Satara) चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. कोयनेचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याची भावना लोकांनी बोलून दाखवली आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे ह चौथे मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.
कोणकोणती पदे भूषवली
-सन १९९७ साली ठाणे मनपात नगरसेवकपदी विराजमान
-सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड
-सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत
-सन २००४ साली विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यातून उमेदवारी
-२००४ साली शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती
-२००४ साली जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती
-सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये आमदार म्हणून विजयी
कोणकोणती मंत्रीपदे भूषवली