Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे मांस

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना निकृष्ट दर्जाचे मांस खाण्यास दिले जात आहे. योग्य प्रमाणात मांस पुरवले जात नसल्यामुळे प्राणी कुपोषित होऊ शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 10:30 AM
देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना निकृष्ट दर्जाचे मांस

देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना निकृष्ट दर्जाचे मांस

Follow Us
Follow Us:

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारासाठी एवढे मोठे कोटींचे कंत्राट देऊनही वाघ कुपोषित असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. तसेच मांसाहारी प्राण्यांना देण्यात येणाऱ्या मांसाची तपासणी केली जात नाही आणि त्यांना योग्य प्रमाणात मांस पुरवले जात नसल्याने ते कुपोषित आहेत का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.(फोटो सौजन्य – istock)

IIT Bombay येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; आशिष शेलार

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारासाठी आवश्यक मांस पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा कंत्राटदार बाहेरचा असून आपण देवनार कत्तलखाना येथून का मास खरेदी करत नाही. तसेच या कंत्राटदारचे कंत्राट एक वर्षांचे न ठेवता पाच वर्षाचे का केले जात नाही, असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.

८८ राणी बागेतील बिबट्या, वाघ, तसर या प्राण्यांना मांस देण्याचे कंत्राट एका वर्षासाठी देण्यात येणार आहे. पण हे कंत्राट पाच वर्षांसाठी देण्यात यावेत, अशी माहिती नगसेविका यामिनी जाधव यांनी दिली आहे. सध्या येथे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने असून त्यांना दररोज मोठ्या प्रमाणावर खाद्यपुरवठा करावा लागतो. विशेषतः वाच, बिबट्या, तरस आणि कोल्हा यासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी ताजे मांस पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अनुभवी कंत्राटदाराकडून हा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, सातत्याने तीन वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद मर्यादित मिळाल्यानंतर अखेर नियमानुसार पात्र कंत्राटदार मेसर्स एवरन्यू ट्रेडर्स यांच्याबरोबर एकूण रु. ६१,७७,७००/- चा कंत्राट करार करण्यात आला, मात्र या करारावर काँग्रेस नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! म्हाडाच्या ११४ वसाहतींचा होणार पुनर्विकास; अंधेरी, वांद्रे आणि वरळीत उभ्या राहणार हाय-टेक टाऊनशिप

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उद्यानाचा मास्टर लेआउट आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार विविध प्राण्यांच्या प्रदर्शनांची कामे पूर्ण झाली आहेत. या राणीबाग प्राणी संग्रहालयामध्ये माकडांचा पिंजरा मोठा आहे, पण त्यामध्ये फक्त केवळ एकच माकड आहे. त्यामुळे माकडाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी, अशी मागणीही मिरांडा यांनी केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Why is meat not being procured from deonar slaughterhouse low quality meat allegedly fed to rani baug tigers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Mumabi
  • tiger

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ
1

Mumbai News: मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.