Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणीतरी आले गं! Pune शहरात घुमणार वाघांची डरकाळी; नागपूरवरून आले नवे पाहुणे, मात्र…

Rajiv Gandhi Zoological Park katraj pune: पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातून साडेचार वर्षांचा नर आणि साडेतीन वर्षांची मादी अशा दोन वाघांचे आगमन झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 07:47 PM
photo-istockphoto

photo-istockphoto

Follow Us
Follow Us:
  • कात्रज प्राणीसंग्रहालयात वाघांची संख्या वाढली
  • प्राणीसंग्रहालया दोन नव्या पाहुण्यांची एन्ट्री
  • नागपूरहून आले नर-मादी वाघ

सुनयना सोनवणे

पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातून साडेचार वर्षांचा नर आणि साडेतीन वर्षांची मादी वाघ गुरुवारी (ता. १५) पुण्यात दाखल झाले. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमधून या दोन्ही वाघांची सुटका करण्यात आली होती. आता त्यांना पुण्यातील प्राणीसंग्रहालयात सुरक्षित वातावरण मिळणार आहे. या वाघांना तीन ते चार आठवडे विलगीकरणात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर आरोग्य तपासणी करून इतर वाघांसोबत ठेवण्यात येईल, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली.

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा

गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील वाघांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने काही वाघांचे अन्य प्राणीसंग्रहालयांत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए), नवी दिल्ली यांनी या दोन वाघांना पुण्यात स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली.

या प्रक्रियेनुसार बुधवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता आवश्यक पशुवैद्यकीय तपासण्या आणि नियोजित कार्यवाही पूर्ण करून दोन्ही वाघांना पुण्यातील पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी घनश्याम मोहन पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना पुण्यात आणले. गुरुवारी दोन्ही वाघ प्राणीसंग्रहालयात दाखल झाले. त्यामुळे येथील वाघांची एकूण संख्या सहा झाली आहे.

दरम्यान, नव्याने दाखल झालेल्या वाघांची नावे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि आरोग्य तपासणीचे निष्कर्ष अनुकूल असल्यास त्यांना इतर वाघांसोबत ठेवण्यात येईल. या स्थलांतरामुळे पुण्यातील प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या वाढली असून, मानव-वन्यजीव संघर्षातून सुटका झालेल्या या दोन्ही वाघांना सुरक्षित निवासाची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Web Title: Pune katraj zoo two new tigers from nagpur gorewada pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • katraj
  • Maharashtra. Pune
  • tiger

संबंधित बातम्या

Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात
1

Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
2

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

Accident News: वाघाच्या पिंजऱ्यात शिरला, अन् पुढच्याच क्षणी वाघाचा हल्ला; घटनास्थळी व्यक्तीचा मृत्यू
3

Accident News: वाघाच्या पिंजऱ्यात शिरला, अन् पुढच्याच क्षणी वाघाचा हल्ला; घटनास्थळी व्यक्तीचा मृत्यू

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
4

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.