Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या योजनेसाठी एकूण १,४२२ अर्ज प्राप्त झाले होते. अल्प उत्पन्न गटासाठी २४ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 06:43 PM
म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाचे मोठे पाऊल!
  • ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण
  • लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य
MHADA Lottery 2026 News : म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील ताथवडे गृहनिर्माण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. या योजनेसाठी एकूण १,४२२ अर्ज प्राप्त झाले होते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत आधुनिक सुविधांनी सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

१० हजार घरांच्या उभारणीचे लक्ष्य

आगरकर नगर येथील म्हाडाच्या गृहनिर्माण भवन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, म्हाडा पुणे मंडळाने नजीकच्या काळात सुमारे १० हजार घरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पुणे आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत.

Mhada Lottery 2026 : घराचे स्वप्न पूर्ण होणार? मुंबईतील 2640 घरांसाठी 75 हजार अर्ज, म्हाडा ड्रॉची उत्सुकता वाढली

विविध भागांत नवीन प्रकल्प

शिरूर येथे चार एकर भूखंडावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभारला जात आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीजवळील खराबवाडी येथे अडीच एकर जागेवर परवडणारी घरे बांधली जात आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत खेड तालुक्यातील रोहकल आणि मुळशी तालुक्यातील नेरे येथे गृहबांधणी प्रकल्प सुरू आहेत.

या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

ताथवडे टप्पा-२ची वैशिष्ट्ये

ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिकांचे हस्तांतरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांसाठी १,४२२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पात: उत्तम दर्जाचे बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, मोक्याचे स्थान, बाजारभावाच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीत घरे, अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

कोणत्या गटांसाठी किती सदनिका?

अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) – २४ सदनिका

मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) – ७६८ सदनिका

विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

घरबसल्या पाहता आली सोडत

सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्यात आले.

या कार्यक्रमाला म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, कार्यकारी अभियंता मनीषा मोरे, उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य दीपक नलावडे, दिपाली पाटील, धनंजय कुलकर्णी, तसेच मिळकत व्यवस्थापक तुषार जायभावे आणि रामचंद्र भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ताथवडे टप्पा-२ची ही सोडत आणि आगामी १० हजार घरांचे उद्दिष्ट हे पुणे आणि परिसरातील मध्यम व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Motilal Nagar redevelopment: मोतीलाल नगर पुनर्विकासावर नवा वाद; इस्टेटव्ह्यूकडून विकास समितीच्या आरोपांचे खंडन

Web Title: Mhada pune tathawade phase 2 lottery announced 792 flats for 1422 applications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • mhada
  • MHADA Lottery 2026
  • Pune

संबंधित बातम्या

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
1

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
3

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू
4

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.