Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासातून नवे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा संशय असून चौकशीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. लग्नाचा वाद, प्रेमसंबंध आणि कथित प्लॅनिंगच्या दिशेने तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची चौकशी सुरू.
  • हत्येपूर्वी अनेक दिवस नियोजन केल्याचा पोलिसांचा दावा.
  • लोहगडावरील घटनाक्रम आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू.
पुणे: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे कट असल्याचा तपासातून दावा करण्यात आला आहे. आता चौकशीदरम्यान मुख्य आरोपी सिया गोयलने केलेल्या कथित खुलाशांमुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार हा कट अनेक दिवसांचं सुनियोजित, काटेकोर प्लानिंग होतं. सियाने सिग्नल देताच चेतनने त्याला ढकललं असे समोर आले आहे.

अग्रवालच्या जामिनाला पोलिसांचा विरोध, अटींचा भंग झाल्याचा दावा; न्यायालयात नेमकं काय घडलं?

३ स्वतंत्र प्लॅन

पोलिस तपासातून असं समोर आलं की, केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतन यांनी तीन स्वतंत्र प्लान्स आखले होते. ३१ मे रोजी सिया केतांसोबत पहिल्यांदाच लोहगड किल्ल्यावर गेली होती. तिथे एका दरीजवळील जागा कथितरित्या ‘डेथ पॉईंट’ (मृत्यूचे ठिकाण) म्हणून निश्चित करण्यात आली होती. १४ जूनला परत सिया केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली. तिने तिथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तिने केतनला धक्का दिला असता एका झाडाला पकडून त्याने आपला जीव वाचवला होता. तेव्हा तिने सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला धक्का दिला होता, असा दावा सियाने करत या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर १८ जून रोजी दुसरी योजना अंमलात आणली गेली. त्यावेळी सियाने चेतनच्या मदतीने तिने लोहगडावरून केतनला ढकलत त्याची हत्या केली. त्यावेळी जर केतन वाचला असता, तर त्याला मारण्यासाठी सियाकडे तिसरी योजनाही तयार होती. जर ती योजना सफल ठरली नसती तर सियाने केतला रस्ते अपघातात मारण्याचा प्लान रचला होता.

सिया आणि चेतनने ठरवले ‘सिग्नल’

चौकशीदरम्यान सिया गोयलने कबूल केले की, केतनला कधी ढकलायचे याबद्दल तिने आणि चेतन चौधरीने आधीच एक ‘सिग्नल’ (संकेत) ठरवला होता. सियाने केतनसमोर वाकून तो संकेत द्यायचा होता, ज्यामुळे चेतनला, त्याला (केतन) दरीत ढकलणं शक्य होणार होतं. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ही योजना अंमलात आणली गेली; चेतन त्या दोघांच्या जवळ येताच सिया खाली वाकली आणि चेतनने केतनला दरीत ढकलून दिलं.

लोहगडाच्या सुरक्षा रक्षकाने काय सांगितले?

लोहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या धीरज जाधव या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना सांगितले की, हत्येच्या दिवशी चेतन चौधरी हा अंग झाकणारे पूर्ण कपडे आणि मास्क घालून किल्ल्यावर आला होता. तिकीट मागितल्यावर त्याने आपण व्यायामासाठी आलो असल्याचे सांगून 25 रुपयांचे प्रवेश शुल्क नंतर भरतो असं सांगितलं होतं. तर सियानेही तिकिटाबाबत वाद घातला आणि नंतर आपण ऑनलाइन पैसे भरू असं सांगितलं होतं.

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात कोणावर आरोप आहेत?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिस तपासात कोणत्या बाबी तपासल्या जात आहेत?

    Ans: घटनाक्रम, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Web Title: Ketan agarwal murder case shocking revelations about the lohagad murder 3 plans a death point and the moment the signal was received chetan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती
1

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ
2

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट
4

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.