Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval News: मावळला मंत्रिपद मिळणार का? पॅराग्लायडर्सची महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2024 | 04:18 PM
मावळला मंत्रिपद मिळणार का

मावळला मंत्रिपद मिळणार का

Follow Us
Close
Follow Us:
वडगाव मावळ:  मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्याच वेळी मावळातील  11 पॅराग्लायडर्सनी 700  फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकावत आमदार शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळण्यासाठी मावळातील या शिलेदारांनी चक्क आकाशातून महायुतीच्या नेत्यांना गवसणी घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधिमंडळ अधिवेशन व मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह संचारला आहे.

‘आमचं ठरलंय’ बॅनरचे आकर्षण

पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या फलकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असे नमूद करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलकही झळकविण्यात आले. याखेरीज सुनील शेळके यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे, पंकजा मुंडे या संभाव्य मंत्र्यांचे फोटो असलेल्या फलकांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाबाबतची मावळवासीयांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “आमचं ठरलंय” असा संदेश देणारे हे बॅनर मावळातील जनतेचा सरकारप्रती असलेला विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक ठरले.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे. पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन आणि मंत्रिपदासाठी अपेक्षा व्यक्त करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाची धुरा सांभाळली. या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे, दत्ता म्हाळसकर या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महायुती सरकारचा नवा अध्याय

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मावळातील तरुणांनी दाखवलेला उत्साह आणि समर्थन ही महायुतीच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे. या अनोख्या पद्धतीने दिल्या गेलेल्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
या उपक्रमाने राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपाने मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचा संदेश या अभिनव प्रयोगातून देण्यात आला.

Web Title: Will maval get a ministerial position nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
2

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.